राज्यातील 8 आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती
नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने भारतीय पोलीस सेवेतील आठ अधिकाऱ्यांना समयश्रेणीत पदोन्नती देवून त्यांना नवीन पदस्थापना दिल्या आहेत.
समश्रेणीत पदोन्नती देवून नवीन नियुक्त्या मिळवणारे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. त्यांच्या नवीन नियुक्त्या कंसात लिहिल्या आहेत. 2019 मधील बॅचचे अधिकारी कमलेश मिणा-सहाय्यक पोलीस अधिक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी केज जि.बीड(समादेशक रा.रा.पोलीस बल गट क्रमांक 13,वडसा, गडचिरोली), 2021 च्या बॅचचे अधिकारी साट्म नवमी दशरथ-सहाय्यक पोलीस अधिक्षक उपविभाग वरोरा, चंद्रपूर (अपर पोलीस अधिक्षक सिंददुर्ग), अनमोल मित्तल-सहाय्यक पोलीस अधिक्षक उपविभाग अकोट जि.अकोला(अपर पोलीस अधिक्षक ठाणे ग्रामीण), बदेली चंद्रकांत रेड्डी-सहाय्यक पोलीस अधिक्षक उपविभाग चाकूर जि.लातूर(अपर पोलीस अधिक्षक अकोला), गुंजाळ सुरज भाऊसाहेब-सहाय्यक पोलीस अधिक्षक उपविभाग मालेगाव जि.नाशिक (अपर पोलीस अधिक्षक परभणी), मस्के अनिल रामदास-सहाय्यक पोलीस अधिक्षक उपविभागय साबनेर, नागपूर(पोलीस उपआयुक्त नाशिक शहर), चिलूमुला रजनिकांत-सहाय्यक पोलीस उपअधिक्षक उपविभाग धारवा, यवतमाळ(समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड), किरितिका सि.एम.सहाय्यक पोलीस उपअधिक्षक उपविभाग नांदेड शहर(पोलीस उपआयुक्त अमरावती शहर). गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या आदेशाने हे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.
नांदेड येथील किरितिका सी.एम.आता अमरावतीच्या पोलीस उपआयुक्त
