नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील जुना मोंढा भागात असलेल्या श्री राम मंदिर येथील महंत श्री.श्री.108 महंत श्रीराम शरणदासजी गुरू रामदासजी महाराज(बैरागी) आज दि.25 जून रोजी वैकुंठवासी झाले.असंख्य भक्तांसमोर त्यांना आज रामघाट येथे शेवटचा निरोप देण्यात आला. त्यावेळी अनेकांचे अश्रु आवरले नाहीत.
सन 1946 मध्ये जन्म झालेले महंत श्रीराम शरणदासजी हे 1971 मध्ये नांदेडच्या श्रीराम मंदिरात महंत म्हणून विराजीत झाले. एकूण 55 वर्ष त्यांनी श्रीराम मंदिराची सेवा केली. 79 व्या वर्षी त्यांना वैकुंठवास झाला. आज दुपारी श्रीराम मंदिरातून त्यांची अंतिम यात्रा निघाली तेंव्हा अनेकांच्या डोळ्यात अश्रु आवरले नाहीत. रामघाट येथे साश्रु नेनांनी त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. ही माहिती श्रीराम शरणदासजी महाराज यांचे विश्य संपदास महाराज यांनी दिली आहे.
श्रीराम मंदिराचे महंत श्री राम शरणदासजी यांचे वैकुंठवास
