उस्माननगर पोलीसांनी अल्पवयीन बालिका आणि तिला पळवून नेणारा आरोपी शोधला

नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीसांनी अल्पवयीन बालिकेला पळवून नेणाऱ्या 26 वर्षीय युवकाला कासारवाडी ता.सिन्नर जि.नाशिक येथून पकडून आणले आहे. हा गुन्हा 1 एप्रिल 2025 रोजी दाखल झाला होता. यावेळी उस्मानगर पोलीस ठाण्यात कोणी तरी दुसराच सहाय्यक पोलीस निरिक्षक कार्यरत होते. खरे तर त्यांची ही चौकशी होणे आवश्यक आहे.
उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार दि.30 मार्च 2025 रोजी रात्री 11.30 वाजता त्यांची अल्पवयीन मुलगी त्याच गावातील परमेश्र्वर वैजनाथ सांगळे(26) याने पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यावेळी उस्माननगर पोलीस ठाण्यात असलेल्या प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरिक्षकांनी काहीच दखल घेतली नाही. सध्या उस्माननगर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार हे कार्यरत आहेत. त्यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरिक्षक गजानन गाडेकर, सुर्यवंशी, पोलीस अंमलदार शिल्पा वाघमारे, पवार, नामदेव रेतीवाड, पद्देवाड यांना अल्पवयीन बालिकेच्या शोधासाठी पाठविले तेंव्हा या पथकाने ता.सिन्नर ता.नाशिक येथील मौजे कासारवाडी येथून अल्पवयीन बालिका आणि तिला पळवून नेणारा युवक परमेश्र्वर वैजनाथ सांगळे (26) यास पकडून आणले. या प्रकरणातील बालाजी वामनराव केंद्रे हा आरोपी पकडायचा आहे. उस्माननगर पोलीसांनी केलेल्या या कार्यवाहीचे कंधारच्या पोलीस उपअधिक्षक डॉ.आश्विनी जगताप यांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!