पुणे (प्रतिनिधी)-ज्येष्ठ विचारवंत, साहित्य, लेखक, तथा 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनिस यांच्या अमृत महोत्सवी वाटचालीचे औचित्य साधून शांतीदुत परिवाराच्यावतीने त्यांच्या निवासस्थानी जावून त्यांना साहित्य सेवेविषयी केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करतांना शतायुष्याची मंगल कामना करण्यात आली. शांतीदुत परिवाराच्यावतीने शांतीदुत सेवारत्न पुरस्कार देवून त्यांचा गौरव करण्यात आला.
डॉ.श्रीपाल सबनिस आणि सौ.ललिता सबनिस यांचे अभिष्टचिंतनाबाबत शांतीदुत परिवाराने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठी साहित्य क्षेत्रातील डॉ.श्रीपाल सबनिस हे सर्व प्रिय व्यक्तीत्व आहे. समाजातील विविध विचारधारा व साहित्य प्रवाहांविषयीची त्यांची विधायक भुमिका संपुर्ण महाराष्ट्र अनुभवतो आहे. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा ही एक जमेची बाजू आहे. डॉ.सबनिस यांच्या वाणीला आणि लेखणीला कोणताही विषय वर्जित नाही. विविध पुस्तके, ग्रंथ व काव्य संग्राहांना डॉ.सबनिस यांनी लिहिलेल्या अभ्यासू प्रस्तावना, स्तंभ लेखन, विषय न्यायीक उच्च संपादने, साक्षेपी समिक्षा आपल्या लेखन कर्तत्वाचीच साक्ष देतात. संत श्री. ज्ञानेश्र्वर ते नव आंबेडकरवाद, वारकरी संगित ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या विविधांगी विषयांवरील डॉ.सबनिस यांच्या साहित्य संपदेतून एक वेगळेच विचार दर्शन घडते. डॉ.सबनिस यांचे अमोघ वत्कृत्व व विचार प्रवण लेखन सांप्रत समयी मराठी साहित्य विश्वाला एक वेगळेच वळण देणारे ठरले आहे. आपल्या सत्काराला उत्तर देतांना डॉ.श्रीपाल सबनिस यांनी साहित्याच्या विषयी भरपूर बाबी स्पष्ट करून सांगितल्या. सेवानिवृत्ती विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.विठ्ठल जाधव, शांतीदुत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ.विद्याताई जाधव, राष्ट्रीय अध्यक्षा सौ.तृषाली जाधव, राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ.आरती घुले, महाराष्ट्र महिला विभागाच्या अध्यक्षा सौ.मोनिका भोजकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजय बोत्रे पाटील, प्रसिध्दी प्रमुख राजेंद्र सोनार, मधु चौधरी, शिवाजीनगर शांतीदुत परिवाराचे अध्यक्ष नितीन दुधाटे हे उपस्थित होते. या कार्यक्रमात सुत्रसंचलन व आभार व्यक्त करण्याची जबाबदारी विजय बोत्रे पाटील यांनी केली.
89 व्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनिस यांचा शांतीदुत परिवाराने सन्मान केला
