नांदेड(प्रतिनिधी)-विभागीय चौकशीमध्ये शिक्षा कमी करून दिल्याचा मोबदला अर्थात लाच आणि ती सुध्दा 7 हजार रुपये मागणी करणाऱ्याला विभागीय वाहतुक अधिकारी लक्ष्मीकांत गवारे विरुध्द लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड येथील कामगार अधिकारी ज्यांची नेमणुक विभागीय राज्य परिवहन कार्यालय नांदेड येथे आले ते लक्ष्मीकांत विठ्ठलराव गवारे यांनी आपल्या विभागीय चौकशीत शिक्षा कमी करून देण्यासाठी 7 हजार रुपये लाच मागल्याची तक्रार तक्रारदाराने 2 मे 2025 रोजी दिली होती. या तक्रारीची पडताळणी 8 मे रोजी करण्यात आली. त्यानंतर 16 मे, 2 जून आणि 17 जून 2025 अशा तिन दिवशी सापळा रचण्यात आला. परंतू सापळा कार्यवाही यशस्वी झाली नाही. 23 जून रोजी सुध्दा सापळा कार्यवाही आयोजित करण्यात आली होती. परंतू तक्रारदाराकडून 7 हजार रुपये लाच कामगार अधिकारी लक्ष्मीकांत गवारे यांनी स्विकारली नाही. पण त्यानंतर लाच मागणीसंदर्भाने भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 356/2025 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम 7(अ) नुसार दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार लाच मागणी करणारा विभागीय वाहतुक अधिकारी गवारे यांना अटक झालेली नाही.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.संजय तुंगार, पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक गजानन बोडके, पोलीस अंमलदार राजेश राठोड, वच्चेवार, सय्यद खदीर, ईश्र्वर जाधव, प्रकाश मामुलवार यांनी पुर्ण केली.
विभागीय वाहतुक अधिकारी 7 हजारांच्या लाच मागणीत अडकला
