नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने तीन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरी गेलेला रोख ऐवज, दोन दुचाकी गाड्या आणि आठ मोबाईल असा एकूण 3 लाख 17 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
दि.20 जून रोजी मोर चौक ते वाडी (बु) रस्त्यावर माणिक संभाजी पावडे यांना खंजीरचा धाक दाखवून तिन गुन्हेगारांसह चार विधीसंघर्षग्रस्त बालकांनी त्यांच्या खिशातील 6 हजार 200 रुपये लुटले होते. त्याप्रकरणी गुन्हा क्रमांक 352/2025 दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक संतोष तांबे, पोलीस उपनिरिक्षक विनोद देखमुख, पोलीस अंमलदार गर्दनमारे, किडे, कदम, मुंडे, लाठकर, चापके, बाबर आदींनी मेहनत करून कृष्णा उर्फ कांद्या उत्तम सोनटक्के (18), रोहन बाबुराव टोम्पे (18) दोघे रा.सम्राट अशोकनगर तसेच प्रेम चंद्रकांत भोसले (22) रा.कल्याणनगर या तिघांसह चार विधीसंघर्षग्रस्त बालकांना पकडले. माणिक पावडे यांचे लुटलेले 6 हजार 200 रुपये रोख रक्कम, दोन दुचाकी गाड्या, आठ मोबाईल आणि खंजीर असा 3 लाख 17 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कार्यवाही केली आहे.
भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने तिन चोरट्यांसह चार अल्पवयीन बालकांना चोरी संदर्भाने पकडले
