राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा

नांदेड :- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर शनिवार 21 जून 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शनिवार 21 जून 2025 रोजी मुंबई येथून नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 5 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 6 वा. 11 वा आंतरराष्ट्रीय भव्य योग दिन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- भक्ती लॉन्स मंगल कार्यालय मालेगाव रोड नांदेड. सकाळी 7 वा. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य योग शिबीर स्थळ- श्री गुरूग्रंथ साहिब हॉल यात्री निवास नांदेड. सकाळी 9 वा. ब्रम्हकुमारी सद्भावना भवन 1/11/774 रुपा गेस्ट हॉऊस रोड वसंतनगर नांदेड येथे आगमन व राखीव. त्यानंतर सोयीनुसार परभणीकडे प्रयाण करतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!