नांदेड –जिल्ह्यातील सकल दिव्यांगांचे पुनर्वसन व्हावं त्यांना जगण्याचं बळ मिळावं यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाचा निधी आमदार खासदारांना दिला जातो. परंतु हा निधी खर्च केला जात नसल्यामुळे सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आंदोलने, उपोषणे करून मोर्चे काढुनही निधी खर्च केला जात नसल्यामुळे सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने पालकमंत्री अतुल सावे यांचा घेराव घालण्याचा इशारा दिला होता परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीने मध्यस्थी करून सकल दिव्यांगांना पालकमंत्री यांची भेट घडून आणली त्यानुसार असंख्य दिव्यांग शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात जमा झाले दिव्यांग शिष्टमंडळासह पालकमंत्री अतुल सावे यांनी हा निधी 100% खर्च करणार असल्याचे दिव्यांग संघटनेशी बोलताना सांगितले.
जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सकल दिव्यांगांसाठी शासनाचा निधी संपूर्ण खर्च करून त्यांचे पुनर्वसन करून छोट्या मोठ्या उद्योगांना निधी देऊन दिव्यांगांना मदत करून निधी उपलब्ध करून शंभर टक्के खर्च करणार असे आदेश बैठकीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी देऊन सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे. चंपतराव डाकोरे.सुनिल जाधव, शिवाजी सुर्यवंशी,सईद वैद्य, मोहसिन खान, कार्तिक कुमार भरतिपुरम, सय्यद आतिक.शेख मतीन, सय्यद आरिफ.प्रेमकुमार वैद्य, अजय गोरे, प्रशांत हणमंते,मुंजाजी कावळे,शेख अलीम, शेख रफिक.भाग्यश्री नागेश्वर. कल्पना सकते, सविता गवते यासह अनेक दिव्यांग उपस्थित होते.