नांदेड,(प्रतिनिधी)-सिंदखेड पोलिसांनी मुलतान चिखली येथील सहा जणांना घातक हत्यारांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पकडले असून किनवट न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.
पोलीस अंमलदार प्रफुल्ल पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 जून 2025 रोजी मध्यरात्रीनंतर पहाटे तीन वाजेच्या सुमारास मांडवी रस्ता, सारखणी ता. किनवट जिल्हा नांदेड येथे ते आणि त्यांमचे सहकारी गस्त करत असताना ऑटो क्रमांक क्रमांक टी एस 16 यु डी 2924 दिसला. त्यामध्ये काहीजण दबा धरून बसले असल्याचे दिसत होते. तेव्हा पोलिसांनी ऑटो थांबवला आणि त्यातील माणसांची नावे विचारली असता शेख फारूक शेख कुर्बान (35), शेख पाशा शेख हमजा (32), शेख अजीम शेख अवनाक (35), शेख गुलफाम शेख शौकत (23), शेख आफ्रिदी शेख जैनुद्दीन (25), शेख जलाल शेख शौकत (24) अशी आहेत. हे सर्व जण राहणार मुलतान चिखली तालुका किनवट येथील आहेत.. त्यांच्याकडे दरोडा घालण्याच्या तयारीसाठी लागतात ती सर्व घातक शस्त्रे मिळून आली.
या लोकांविरुद्ध गुन्हा 88/2025 दाखल करण्यात आला आहे किनवट न्यायालयाने या सहा जणांना चार दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे. सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर, पोलीस अंमलदार गजानन कुमरे, गोविंद कदम, सतीश कोंडा पलकुलवार, रघुनाथ मडावी, प्रफुल्ल पवार, संदीप वानखेडे, संजय शेंडे, रविकांत कांबळे, श्याम चव्हाण, ज्ञानेश्वर वेलदोडे यांनी हि कार्यवाही केली.अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांनी या कार्यवाहीसाठी सिंधखेड पोलिसांचे कौतुक केले आहे.