नांदेड,(प्रतिनिधी)-शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते नवनाथ काकडे यांची शिवसेना जिल्हा संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती शिवसेना नांदेड आ. बालाजी कल्याणकर साहेब व जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे, तालुका प्रमुख धनंजय पावडे, तालुका प्रमुख गणेश बोकारे, ओबीसी तालुका प्रमुख जनकवाडे आणि राजु वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नवनाथ काकडे यांची ही निवड पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाची ठरेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.