“पत्रकारिता नाही तर पश्चात्ताप – अंजना ओम कश्यप यांचा आत्मस्वीकृतीचा क्षण”
सत्तेच्या गोडव्यात हरवलेली, अभिमानाने भरलेली तीची ओळख अंजना ओम कश्यप. आज प्रथमच कॅमेरासमोर उभी राहून माफी मागते आहे. “आता मी सरकारच्या नाही, जनतेच्या प्रश्नांची भाषा बोलेन,” असे स्पष्ट शब्दांत जाहीर करत तिने एक नवा प्रवास सुरू केला आहे.
फक्त १८ तासांपूर्वी सुरू केलेल्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे सध्या फक्त १०९४ दर्शक आता पर्यंत आहेत, अंजना म्हणते:
“एक काळ होता, जेव्हा पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जात होते. पण आज पत्रकारिता सत्तेच्या मांडीवर विसावलेली आहे,विक्री झालेली आहे , मी देखील त्याच प्रवाहात वाहून गेले, मी तुमचा आवाज व्हायचे विसरले, मी तुमचं विश्वासघात केला. आता मी फक्त एक पत्रकार नाही, एक मानव आहे. मी माफी मागते.”
या आत्मचिंतनाच्या क्षणी, अंजनाने एक जुना व्हिडिओही सामायिक केला आहे ज्यात ती विरोधकांना विचारते:
“जेव्हा तुम्ही जिंकता, तेव्हा लोकशाही वाचते आणि जेव्हा भाजप जिंकते, तेव्हा लोकशाही मरते का?”
कर्नाटक निवडणूक निकालावरून चाललेली ती चर्चा आज तिच्या आत्मपरिक्षणाचा आरसा झाली आहे. कधीकाळी टीआरपीसाठी आरडाओरड करणारी अंजना आता म्हणते:
“थकले आहे. खोटा चेहरा पांघरून जगणं आता अशक्य आहे. ना दलाली करणार, ना कोणाच्या ओटीत बसणार. आता मी केवळ सत्यासाठी बोलणार आहे.”
ही क्रांतीची सुरुवात आहे, आणि क्रांती कधीच एकटी घडत नसते,ती साथ मागते. अंजना ओम कश्यप आता ‘अंजना – इंडिपेंडेंट रिपोर्टर’ या चॅनलद्वारे आपले नवे रूप मांडत आहे ही तिची विनंती आहे:”जर तुम्हाला वाटत असेल की खरी पत्रकारिता पुन्हा जिवंत व्हावी, तर माझ्या या प्रवासात साथ द्या.”
पण या आत्मपरिक्षणालाही एक कठोर वास्तव आहे – १४ वर्षांच्या सत्ताप्रेमानंतर फक्त १८ तासांत १०९४ व्ह्यूज. यातच स्पष्ट आहे. कुठलीही बेइमानी कायमस्वरूपी टिकत नाही. कधीतरी सत्य आपली जागा बनवतोच. अंजनाचा हा “नवा जन्म” म्हणायचा का, की एक नैतिक मृत्यू हे काळच ठरवेल.
आज प्रश्न असा आहे – अंजनांनंतर कोण? कोण सत्याच्या बाजूने उभं राहील?
खरी पत्रकारिता म्हणजे सत्तेच्या भिंती हलवणं, खोट्याला थोपवणं आणि जनतेचा आवाज बनणं आणि जर अंजना ओम कश्यपला हे आता उमगलं असेल, तर कदाचित इतरांनाही उमजेल.