नांदेड(प्रतिनिधी)-दारु पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून आपल्या 60 वर्षीय आईला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुपूत्राविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीसाांनी गुन्न्हा दाखल केला आहे.
बसवेश्र्वरनगर कौठा येथे राहणारया 60 वर्षीय महिला छायाबाई चंद्रकांत मैड यांनी दिलेल्या तक्र्रारीनुसार बसवेश्र्वरनगर मातोश्री मंगल कार्यालयाजवळ दि.8 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता त्यांचा पुत्र सुधीर चंद्रकांत मैड याने मला दारु पिण्यासाठी पैसे का देत नाहीस, संपत्ती माझ्या नावाने का करत नाहीस असे सांगत माझ्या अंगावर पेट्रोल टाकत माचिस पेटवून जाळून मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 561/2025 नुसार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
कुपूत्राने आईला जिवे मारण्याचा प्रयत्न
