जबरी चोरीचे मालकच निघाले चोर

नांदेड(प्रतिनिधी)-जबरी चोरीचा बनावट पणा करून स्वत:च गायब केलेल्या 1 लाख 51 हजार 340 रुपयांचा गुन्हा उघडकीस आणला असून मालकच चोर निघाले आहेत. यात संपुर्ण रक्कम जप्त करण्यात आली आहे.
दि.9 जून रोजी सागर नरेंद्र भारतीया यांनी तक्रार दिली की, ते आयडीबीआय बॅंकेमध्ये कामासाठी गेले असतांना त्यांचा गोल्डन थ्र्रीटल बार येथे कामम करणाऱ्या राजेंद्र शेषराव जाधव यांनी सांगितले की, मागील चार दिवसांची बारमधील जमा रक्कम 51 लाख 51 हजार 340 रुपये घेवून महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत भरण्यासाठी जात असतांना दुपारी 2 वाजेच्यासुमारास डीआरएम कार्यालयाच्या गेट क्रमंाक 2 समोर 2 जण आले. ज्यांनी आपले तोंड बांधलेले होते, त्यांच्या दुचाकीला नंबर नव्हता. त्यांनी खंजीरचा दाख दाखवून रोख रक्कमेची थैली पळवून नेली आहे. या प्रकरणी 10 जून रोजी गुन्हा क्रमांक 226/2025 विमानतळ पोलीसांनी दाखल केला होता.
विमानतळचे पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी अत्यंत कौशल्यपुर्ण तपास करत राजेंद्र शेषराव जाधव (38) रा.गोपाळनगर सांगवी आणि दिगंबर बालागौडा गुंडलवाड (27) रा.अंबानगर सांगवी या दोघांना पकडले आणि त्यांनी बनावटपणे जबरी चोरीची तक्रार दिल्याचे मान्य केले. विमानतळ पोलीसांनी 6 तासात हा गुन्हा उघडकीस आणला आणि चोरी गेली असे दाखवलेली 1 लाख 51 हजार 340 रुपये रोख रक्कम जप्त करून उत्कृष्ट कार्यवाही केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक साने यांच्याकडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!