दबंग पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी चोरीच्या गुन्ह्यातील 100 टक्के साहित्य जप्त केले

नांदेड(प्रतिनिधी)-8 जून रोजी दाखल झालेल्या 1 लाख 71 हजार 500 रुपयांचा चोरीचा तपास दबंग पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्यासह 24 तासातच उघडकीस आणला. या घटनेत चोरी गेलेले 100 साहित्य जप्त करण्यात आले आहे.
रहिमनगर, दुधडेअरीजवळ राहणाऱ्या शेख मौला शेख मोहम्मद यांनी अनावधानाने आपल्या घराला कुलूप लावले नाही. या संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला आणि त्यांच्या घरातून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिणे असा 1 लाख 71 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. मुळात ही घटना 6 जून रोजी झाली होती. पण या हा गुन्हा 8 जून रोजी दाखल झाला. त्यात रहिमपुरमध्ये राहणारा सय्यद मोहम्मद सय्यद ईस्माईल (31) यास पोलीसांनी पकडले आणि त्याच्याकडून शेख मौला यांच्या घरातील चोरलेले 100 साहित्य जप्त केले आहे.
पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही पोलीस उपनिरिक्षक बाबुराव चव्हाण, पोलीस अंमलदार प्रमोद कऱ्हाळे, विठ्ठल भिसे, संघरत्न गायकवाड, संजय शिरगिरे, शंकर माळगे यांनी केली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!