नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर येथे दोन नावांसह आठ ते दहा अनोळखी लोकांविरुध्द 60 हजार रुपयांचा दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हदगाव येथील ग्रीन पार्क कॉलनीमध्ये एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 74 हजारांचा ऐजव लंपास केला आहे. तेहरानगर भागात चोरट्यांनी एका घरातून 60 हजारांचा ऐवज लांबवला आहे. मुखेड तालुक्यातील देवला तांडा येथे एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह दोन जणांनी 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
हिमायतनगर येथील गजानन विजय जिद्देवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 जून रोजी दुपारी 1.30 वाजेच्यासुमारास शेख अफरोज, सोनु देवसरकर आणि त्यांच्यासोबत 8 ते 10 दुसरे लोक सर्व रा.विरसनी ता.हिमायतनगर हे आले. गजानन जिद्देवारच्या गालावर चापटा मारून लाकडाने दोन्ही पायांवर मुक्का मार दिला. त्यांच्या गळ्यातील 5 ग्रॅम सोन्याची चैन 40 हजार रुपये किंमतीची आणि दोन मोबाईल 60 हजार रुपये किंमतीचे फोडून नुकसान केले. गजानन जिद्देवार पत्रकार सुध्दा आहेत. हिमायतनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 120/2025 प्रमाणे दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक नामदेव मद्दे अधिक तपास करीत आहेत.
अंजली उत्तमराव माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 जूनच्या सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेदरम्यान त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 2 लाख 69 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे आणि 5 हजार 500 रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 74 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हदगाव पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 183/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक रायबोळे अधिक तपास करीत आहेत.
तेहरानगर येथील अश्र्विनी मिलिंद जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जूनच्या सायंकाळी 5 ते 6 जूनच्या सकाळी 8 वाजेदरम्यान त्यांचे घरबंद असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील पितळी घागर, स्टिलची टाकी, पातेले, होम थेअटर, मिक्सर, पाण्याची मोटार असा दहा हजार रुपयांचा ऐवज आणि 50 हजार रुपये रोख रक्कम असा 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 216/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार शिरसाट अधिक तपास करीत आहेत.
शिवाजी गोविंद राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जूनच्या रात्री 9 वाजेच्यासुमारास मौजे देवला तांडा ता.मुखेड येथील बालाजी रामकिशन भोसले आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक या दोघांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांचा 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मुखेड पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमंाक 126/2025 नुसार दाखल केली असून पोलीस अंमलदार कदम अधिक तपास करीत आहेत.
हिमायतनगर येथे दरोडा, हदगाव येथे चोरी, तेहरानगरमध्ये चोरी, देवला तांडा ता.मुखेड येथे चोरी
