बिलोली(प्रतिनिधी)-मांजरा नदी येथून वाळू भरून नरसी कडे जात असलेल्या हायवाने स्कुटी वरील 65 वर्षीय इसमास पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे स्कुटी स्वार मागच्या चाकामध्ये आला यात वयोवृध्द इसमाचा जागिच मृत्यू झाला आहे.ही घटना बिलोली शहरात पंचायत समिती समोर दिनांक 6 जून रोजी दुपारी 4 वाजता घडली. याबाबत माहिती अशी की बिलोली तालुक्यातील बेळकोणी (बु.) येथील किशन रामा वाघमारे वय 65 वर्षे धंदा शेती यांनी आपल्या स्कुटी क्रमांक एम.एच.12 इ.पी.2263 यावरून बस स्थानकाकडे जात असताना मांजरा नदीतून वाळूने भरलेल्या हायवा क्रमांक एम.एच.12 यु.एम.0032च्या चालकाने निष्काळजीपणाने वाहन चालवुन पाठीमागून जोराची धडक दिली.त्यानंतर मयतास बिलोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात शेव विच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.याप्रकरणी बिलोली पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन चालकाला अटक करून पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती.बिलोली शहरात अतिक्रमण वाढल्याने असेच बळी जात असून सर्व व्यावसायिक आपले बस्थान रोडवरच मांडत आहेत.वाहन चालकांना वाहणासाठीचा रस्ता अपुरा पडत असून यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे.मयत किशन रामा वाघमारे हे प्राध्यापक राहुल वाघमारे यांचे वडील होत अपघातानंतर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Post Views: 1,427 Facebook WhatsApp Twitter LinkedIn Post navigation वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ;हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना राज्यात दहा पोलीस उपअधिक्षकांना बृहन्मुंबईमध्ये नियुक्ती