नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने 11 पोलीस उपअधिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यातील दहा जणांना बृहन्मुंबईमध्ये नवीन नियुक्ती दिली आहे. या आदेशावर गृहविभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. राज्य शासनाने बृहन्मुंबईमध्ये पाठविलेले पोलीस उपअधिक्षक अर्थात सहाय्यक पोलीस आयुक्त पुढील प्रमाणे आहेत. त्यांची जुनी नियुक्ती त्यांच्या नावासमोर लिहिली आहे. संजय दामोदर डहाके-पोलीस उपअधिक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा, महेश नारायणराव मुगूटराव-पोलीस उपअधिक्षक गुन्हे प्रगटीकरण प्रशिक्षण केंद्र नाशिक, अविनाश प्रल्हाद पालवे-पोलीस उपअधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक पुणे,ज्योत्सना विलास रासम/ ज्योत्सना जगन्नाथ सुर्वे-पोलीस उपअधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक रायगड, कल्पना यशवंत गाडेकर-पोलीस उपअधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक ठाणे, सुर्यकांत गणपत बांगर-उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड लोहमार्ग उपविभाग, छत्रपती संभाजीनगर, मृत्यूंजय धानय्या हिरेमठ-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय कोल्हापूर, रेणुका शिवराज बुवा(होनप)-पोलीस उपअधिक्षक विशेष पोलीस महानिरिक्षक,नाशिक परिक्षेत्र यांचे वाचक, शशिकांत शंकर माने-अपर पोलीस अधिक्षक (एटप), गुन्हे अन्वेषण विभाग कोकण भवन नवी मुंबई, सुहास पांडूरंग कांबळे-महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक. या त एक पोलीस उपअधिक्षक असे आहेत की, जे मनोज बाबूराव खंडाळे यांना बृहन्मुंबई येथील सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून पोलीस उपअधिक्षक गुन्हे प्रगटीकरण प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे पाठविण्यात आले आहे. राज्य शासनाने आपला हा शासन निर्णय संकेतांक क्रमांक 202506061538413029 प्रमाणे शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,674 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बिलोली येथे वाळुने भरलेल्या हायवाची स्कुटीला धडक वयोवृध्द ठार आजच्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त भीती वाटत आहे, ती ‘ग्रोन्क’ या एआय माध्यमाची