नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पत्नीच्या नावाने शेतीच्या 7/12 चे हस्तांतरण करण्यासाठी 16 हजार हजार रुपये लाच स्विकारतांना किनवट तालुक्यातील दोन महिला तलाठ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
एका तक्रारदाराने तक्रार दिली की, त्यांची वडीलोपार्जित शेती आहे आणि ती शेती 7 एकर आहे. त्यापैकी साडेतीन एक शेती तक्रारदाराच्या पत्नीच्या नावाने करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज दिला. त्या कामाच्या अनुशंगाने तलाठ्यांची भेट घेतली असता अगोदर 40 हजार रुपये लाच मागितली आणि तडजोडीनंतर 17 हजार रुपये लाच मागत आहेत अशी तक्रार 29 मे 2025 रोजी दिली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 3 जून 2025 रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी तलाठी सुजाता शंकरराव गवळे यांची भेट घेतली आणि त्यावेळी त्यांनी तलाठी भाग्यश्री भिमराव तेलंगे यांना भेटण्यास सांगितले. तेंव्हा तेलंगे मॅड सांगतात असे त्या म्हणाल्या. त्यानंतर तक्रारदारांनी तलाठी तेलंगे यांना कामासंदर्भाने विचारले असता तेंव्हा तलाठी तेलंगे म्हणाल्या त्या दिवशी 3 हजार कमी केले. तेंव्हा तक्रारदार म्हणाले 17 हजार म्हणाले होते. तेंव्हा तलाठी गवळे यांनी 18 हजार रुपये द्या असे म्हणाल्या. तेंव्हा तक्रारदार यांनी 18 हजार आणू की 16 आणू असे म्हणाले. तेंव्हा तलाठी तेलंगे यांनी 16 हजार असे म्हणून स्वत:साठी व तलाठी गवळे यांच्यासाठी लाचेची मागणी करून लाच स्विकारतांना 3 जून 2025 रोजी दोन्ही तलाठी महिलांना अटक करण्यात आली. त्यांची पुर्ण नावे अशी आहेत. भाग्यश्री भिमराव तेलंगे (34) तलाठी सज्जा निचपुर ता.किनवट जि.नांदेड आणि सुजाता शंकर गवळे (25) तलाठी सज्जा कणकवाडी ता.किनवट जि.नांदेड अशी आहेत.
सोबतच आरोपींच्या अंगझडतीमध्ये मोबाईल आणि रोख रक्कम 6 हजार 620 रुपये आणि आरोपी गवळे यांच्या ताब्यातून 18 हजार 820 रुपये मिळून आले. या दोन्ही तलाठी महिलांच्या किनवट आणि नांदेडमधील घरांची झडती सुरू आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधिक्षक संजय तुंगार, पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक प्रिती जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शेख रसुल, पोलीस अंमलदार अर्शद अहेमद खान, सय्यद खदीर आणि चालाक पोलीस अंमलदार गजानन राऊत यांनी ही कार्यवाही केली.
16 हजारांच्या लाच जाळ्यात अडकल्या दोन महिला तलाठी; किनवट तालुक्यातील घटना
