नांदेड(प्रतिनिधी)-कंधार येथील दुसरे जिल्हा न्यायाधीश अमिताभ पंचभाई यांचा मोबाईल दोन चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेल्याचा प्रकार 1 जून रोजी रात्री खुराणा ट्रॅव्हल्स हिंगोली गेट जवळ घडला.
कंधार न्यायालयातील सेवक गोविंद पांडूरंग रामतिर्थे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 जून रोजी रात्री 9.15 वाजता कंधार येथील दुसरे जिल्हा न्यायाधीश अमिताभ पंचभाई हे खुराणा ट्रॅव्हल्सजवळ मोबाईल कानाला लावून बोलत असतांना दोन जण बिना नंबरच्या दुचाकीवर आले आणि त्यांचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून नेला आहे. वजिराबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमंाक 238/2025 नुसार दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे अधिक तपास करीत आहेत.
जिल्हा न्यायाधीशांचा मोबाईल बळजबरीने हिसकावला
