नांदेड(प्रतिनिधी)-मौजे कोल्हे बोरगाव ता.बिलोली येथे 1 पेक्षा जास्त घरे फोडून चोरट्यांंनी 2 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच मुखेड बसस्थानकात एका महिलेच्या बॅगची चेन उघडून दागिण्यांची कॅरीबॅग तसेच बहिनीच्या पर्समधील रोख रक्कम असा 76 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. धर्माबाद तालुक्यातील आतुरफाटा येथून 1 लाख 70 हजार रुपयांचा टिपर चोरीला गेला आहे.
शेषराव मारोती भुसेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 मेच्या रात्री 11 ते 1 जूनच्या पहाटे 5 वाजेदरम्यान त्यांचे आणि साक्षीदारांचे घरफोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिणे आणि सोबत दोन दुचाकी गाड्या असा 2 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. रामतिर्थ पोलीसंानी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 55/2025 दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक नरवाडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
दि.1 जून रोजी दुपारी 12.30 वाजता शिल्पा शिवाजी ढोसने या महिला मुखेड बसस्थानकात आपल्या बहिणीसह निजामाबाद येथे जाण्यासाठी आल्या होत्या. त्या बिलोली धर्माबाद या बसमध्ये प्रवेश करतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या पर्सची चेन काढून त्यात ठेवलेली दागिण्यांची कॅरीबॅग व शिल्पाच्या बहिणीच्या पर्समधील रोख रक्कम असा एकूण 76 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मुखेड पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 120/2025 प्रमाणे दाखल केली असून प ोलीस अंमलदार गोंटे अधिक तपास करीत आहेत.
नागनाथ गंगाराम जिंकले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 मेच्या सायंकाळी 6 ते 29 मे च्या रात्री 11 वाजेदरम्यान त्यांनी इंडियन पेट्रोल पंप आतूर फाटा ता.धर्माबाद येथे उभा केलेला त्यांच्या मालकीचा टिपर क्रमांक एम.एच.04 डी.डी.8480 हा ेचोरुन नेला आहे. या टिपरची किंमत 1 लाख 70 हजार रुपये आहे. धर्माबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 150/2025 प्रमाणे दाखल केली असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भालेराव यांच्याकडे देण्यात आला आहे.
बोरगाव ता.बिलोली येथे घरेफोडून 2 लाख 70 हजारांचा ऐवज लंपास; मुखेड बसस्थानकात महिलांच्या पर्समधून चोरी
