सरसेनापती इंजि.आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम 

जिल्हा अध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांचा पुढाकार 

नांदेड :– महामानव , विश्वरत्न , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांना रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते , आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सरसेनापती इंजि.आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 2 जून रोजी सकाळी 11 वाजता डॉ. आंबेडकर नगर नांदेड येथील त्रिरत्न विहार परिसरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . नेत्र रोग तपासणी , 100 रुग्णांना मोफत चष्मे वाटप , गरजू रुग्णाचे मोती बिंदूंचे ऑपरेशन , रक्तदान शिबिर , फळ वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .

या कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक , ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल , प्रवीण जेठेवाड , माधव जमदाडे आदींची उपस्थिती राहणार असल्याचेही रिपब्लिकन सेनेचे नांदेड महानगर अध्यक्ष राहुल चिखलीकर, युवा नेते रुपेश सोनसळे यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!