स्वातंत्र्य सैनिक साथी बालाराम यादव यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी : बिशन यादव

नांदेड – १९४८ च्या हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, १९७५ मध्ये आणीबाणीविरुद्धच्या चळवळीत समाजवादी नेत्यांसह १९ महिने नाशिक तुरुंगात तुरुंगवास भोगलेले समाजवादी संघर्षशील नेते, १९६९ पासून महाराष्ट्रात अखिल भारतीय यादव महासभेचा ध्वज फडकवणारे प्रमुख नेते आणि यादव अहिर मंडळ यदुकुल वजीराबादचे माजी अध्यक्ष, नांदेड, दिवंगत सती बालाराम बिशनलाल यादव नांदेड यांना यादव महासभेच्या वतीने त्यांच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

आज 29 मे 2025 रोजी, हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, दिवंगत साथी बालाराम यादवजी यांना त्यांच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वजीराबाद, नांदेड येथील बालाराम यादव नगर येथे एक विनम्र श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नांदेड येथील वजिराबाद परिसरात त्यांच्या ‘स्वातंत्र्य सेनानी बालाराम यादव नगर’ या फलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. व त्यानंतर यादव अहिर मंडळ वजिराबाद नांदेड येथील ‘यदुकुल’ कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अखिल भारतीय यादव महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस बिशनकुमार यादव, नांदेड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक किशोर यादव, माजी नगरसेवक धीरज यादव, डॉ. कैलाश यादव, भारतभूषण यादव, गौरव कृष्ण यादव/बालाराम यादव यांचे नातू, गोकुल यादव, संजय यादव, मुनगंटीवार पाटील, गोविंद यादव, शिवकुमार यादव, डॉ. गोपाल यादव, बाळू कुलकर्णी, चंद्रभान यादव, अजय यादव, ईश्वर बटाववाले, अमोल यादव, मनु बटाववाले, शुभम यादव, प्रशांत बोडके, प्रेम जुन्नी, बबलू चाऊस, संजय शर्मा, किशोर शर्मा, ईश्वर पाटील, गणेश चौधरी आदी उपस्थित होते. इतर मान्यवर उपस्थित होते..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!