नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या शालेय व क्रिडा शिक्षण विभागाने राज्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय आणि निम शासकीय तसेच इतर नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयावर विभागाचे उपसचिव सुनिल पांढरे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
नवीन शासन निर्णयानुसार भारतीय ऑलम्पीक समितीशी संलग्नता/ मान्यता असलेली तसेच अंतर राष्ट्रीय ऑलम्पीक समिती / ऑलम्पीक कॉन्सील ऑफ इंडिया समितीशी संलग्नता/ मान्यता असलेल्या अंतरराष्ट्रीय फेडरेशनशी संलग्न असलेल्या राष्ट्रीय क्रिडा संघटनांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा आणि राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धामधील खेळाडू शासकीय, निम शासकीय आणि इतर नोकऱ्यांमध्ये 5 टक्के आरक्षण प्राप्त करू शकते.
भारतीय ऑलम्पीक समितीशी संलग्नता/ मान्यता असलेल्या राष्ट्रीय फेडरेशनशी संलग्न असलेली व महाराष्ट्र ऑलम्पीक समितीशी संलग्नता / मान्यता असलेल्या राज्यातील एक विध खेळ राज्य संघटनेद्वारा आयोजित केलेल्या असाव्यात. ज्या खेळाचा समावेश ऑलम्पीक, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स या पैकी कोणत्याही एका स्पर्धेमध्ये असलेल्या खेळाबाबत आरक्षण सुविधा उपलब्ध असते. 5 टक्के खेळाडू आरक्षणा संदर्भातील वेळोवेळी निर्गमित केलल्या शासन निर्णयातील अन्य तरतुदी तशाच लागू राहतील. राज्य शासनाने आपला हा शासन निर्णय संकेतांक क्रमंाक 202505281810412621 नुसार आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
राष्ट्रीय खेळाडूंना मिळणार नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण
