कोणीही बोलावले नसतांना भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात वेगवेगळे प्रतिनिधी मंडळ भारतावर होणाऱ्या आतंकवादाच्या त्रासाला सार्वजनिक करण्यासाठी पाठविले. या प्रतिनिधी मंडळामध्ये सर्वच पक्षांचे नेते आहेत. पण नरेंद्र मोदी यांनी काही ठिकाणी यातही राजकारण केले. एकीकडे कॉंगे्रसने नाव न पाठविता त्यांनी कॉंगे्रस पक्षाचे शशी थरुर यांना त्या प्रतिनिधी मंडळात जागा दिली. परंतू त्यांनी बोललेल्या काही घटनांमुळे मोदी अडचणीत आले आहेत. भारतात हिंदु-मुस्लिम असा भेदभाव करणाऱ्या असदोद्दीन ओवेसी यांनी मात्र बहरीन या मुस्लिम देशात बसून पाकिस्तानला दिलेली समज म्हणजे त्यांच्या शब्दात तो सर्जिकल स्ट्राईक आहे. या प्रतिनिधी मंडळातील खा.निशिकांत दुबे मात्र खोट्या बाबी सांगून आपलेच हस्य करून घेत आहेत. म्हणजे जगासमोर भारताचा काय विचार होईल याचा विचार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करायला हवा.

कॉंगे्रसची इच्दा नसतांना सुध्दा शशी थरुर यांना भारतीय जनता पार्टीने विदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळात समाविष्ठ केले. शशी थरुर यांचा अभ्यास भरपूर आहे. ते चांगले कुटनिती तज्ञ आहेत आणि त्यांची इंग्रजी भाषा तर एवढी श्रीमंत आहे की, अनेकांना त्यांच्या शब्दांचा अर्थ पाहण्यासाठी शब्दकोषाची मदत घ्यावी लागते. अमेरिकेेत गेल्यावर त्यांनी सर्व प्रथम 9/11 या ट्विनटावर या इमारतीला भेट दिली. तेथे पुष्पवाहुन त्या ठिकाणी मरण पावलेल्यांना आपली श्रध्दा सुमने अर्पित केली. याचा अर्थ त्यांनी अमेरिकेला दाखवले की, आम्ही गेली 30 वर्ष भारतात आतंकवाद सोसतो आहोत. हा काही शब्द न सांगता आतंकवाद्यांना पाठीशी घालणाऱ्यांसाठी टोला होता. त्यांनी असेही सांगितले की, 9/11 ला अमेरिकेत हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेन हा अमेरिकेने अत्यंत सुरक्षीत अशा पाकिस्तानमधील एबटाबाद मधून शोधून आणला हे सांगितले. परंतू यावेळी त्यांनी एक महत्वाची बाब सांगितली, सन 2015 मध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अफगाणिस्थानच्या दौऱ्यातून थेट पाकिस्तानला गेले होते. त्या दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नातीचे लग्न होते आणि नवाज शरीफ यांचा जन्मदिवस होता. एक-दोन तासांची भेट झाली. पण भारतीय पंतप्रधान किती ताकतवान आहेत असे त्यावेळेस आम्हालाही वाटले होते, भारताच्या प्रत्येक नागरीकाला वाटत होते. पण त्यांच्या भेटीनंतर काहीच दिवसात अतिरेक्यांनी पठाणकोट येथील भारताच्या एअरबेसवर हल्ला केला. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: नवाज शरीफ यांना फोन करून पठाण कोट येथील हल्याची चौकशी करण्यामध्ये सहकार्य करण्यास सांगितले होते आणि त्यावेळी आयएसआयचे एजंट पठाणकोटला आले होते. परंतू पाकिस्तान पाकिस्तानच त्यांनी परत जाऊन आम्हाला कोणताही पुरावा सापडला नाही असे सांगून हात वर केले. अशा पध्दतीचा देशद्रोह करून सुध्दा त्याची राजनिती केली जाते. त्यावेळी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंघ यांनी धिस इज द ब्लंडर ऑफ मोदी असे सांगितले होते. आता ही बाब 2015 ची आहे आणि शशी थरुर यांनी ती 2025 मध्ये उघड केली. म्हणजे जगाला याबद्दल विसर पडला असेल तरी ती समृत्ती पुन्हा जागृत झाली. त्यावेळी विरोधकांनी आमच्या सैन्याची सैन्यस्थळे का दाखवली असा वाद केला होता. आता हे बोलणे मोदीसाठी त्रासदाय झाले आहे.त्यावेळी विदेशमंत्री असलेल्या सुषमा स्वराज यांनी पाकिस्तान भेटीबद्दल काही वाईट बोलले नाही. परंतू तुमचे हे काम आऊट ऑफ बॉक्स आहे असे शब्द वापले होते आणि हा अभिलेख आहे.शशी थरुर यांनी नरेंद्र मोदी, पाकिस्तान आणि तुर्कस्थान यांचे संबंध सुध्दा उघड करतांना सांगितले की, 6 फेबु्रवारी 2023 रोजी तुर्कस्थान आणि सीरीयामध्ये खुप मोठा भुकंप झाला. त्या भुकंपात जिवीत आणि वित्त हानी मोठ्या स्वरुपात झाली. तेंव्हा केरळा सरकारने 10 कोटी रुपये तुर्कस्थानला मदत म्हणून दिले होते असे सांगितले. हे सांगतांना शशी थरुर यांना केरळाच्या डाव्या सरकारची बदनामी करायची होती. परंतू ते हे विसरले की, ही मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ऑपरेशन दोस्तीमधील होती. कारण केरळा सरकारने 10 कोटीच दिले. परंतू सर्व सरकारने मिळून 60 कोटी रुपयांचे साहित्य पाठविले होते. भारतीय सैन्य तेथे गेले होते, हवाई दल तेथे गेले होते, श्वान पथक तेथे गेले होते. ढिगाऱ्यांमध्ये पडलेल्या जिवंत आणि मृत माणसांचा शोध घेतला होता, वैद्यकीय पथक पाठविले होते. जर शशी थरुर यांच्या म्हणण्याप्रमाणे केरळा सरकारने मुर्खपणा केला होता तर ऑपरेशन दोस्ती राबवणाऱ्या पंतप्रधानांबद्दल काय म्हणावे लागेल. याचा विचार वाचकांनी करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे भारत नाही. म्हणूनच भारताच्या जनतेने तुर्कस्थानशी असलेले व्यापारी संबंध संपविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांचे साहित्य बोलवले जात नाही आहे आणि कंपन्यांसोबत असलेले करार रद्द करण्यात आले आहे. हे सर्व सांगत असतांना शशी थरुर यांनी पहलगामचे नाव सुध्दा घेतले नाही आणि हेही सांगून टाकले की, मी भारतीय सत्ता पक्षाचा भाग नाही. म्हणजेच शशी थरुर यांच्या बोलण्याने बसलेला धक्का पंतप्रधान कसे सांभाळतील याचाही विचार वाचकांनी करावा.
एस.जयशंकर सुध्दा हल्याच्यापुर्वी आम्ही पाकिस्तानला कल्पना दिली असे सांगितल्यामुळे नवीन वाद झाला. तो सुध्दा देशाच्या पंतप्रधानांसाठी चांगला नाही. एस.जयशंकर यांच्या बोलण्यावर विरोधी पक्ष त्याला देशद्रोहच म्हणत आहे. विदेशमंत्रालयाने एस. जयशंकर यांच्या बोलण्याचे खंडण केले आहे. एस.जयशंकरच्या बोलण्याला पाठबळ देतांना या शिष्टमंडळातील एक खासदार निशिकांत दुबे यांनी एक अजब कारभार केला. 1991 मध्ये झालेल्या एका करारासोबत उल्लेख केला की, हल्याअगोदर सांगणे या करारात नमुद आहे. हा करार वाचला तर हा करार सैन्य अभ्यासासाठी आहे. म्हणजे दुसऱ्या देशाचे विमान उडत असतांना ही एफलत होवू नये म्हणून तो सैन्य अभ्यास आहे अशी माहिती त्यांना त्या कराराप्रमाणे देणे आवश्यक होते. प्रत्यक्षात हल्ला करायचा असेल तर हा करार तेथे उपयोगी पडत नाही. त्यामुळे आता खा.दुबेचेच हसु होत आहे.

भारतीय जनता पार्टी भारतात हिंदु-मुस्लिम हा वाद चालवते. परंतू पंतप्रधान दुबईला जाऊन शेखांच्या गळाभेट घेतात. तेथे हिंदु-मुस्लिम काही नाही. यामध्ये खरे हिरो ठरले. खा.असदोद्दिन ओवेसी. बहरीन या मुस्लिम देशात भारताचे प्रतिनिधीत्व करतांना त्यांनी सांगितले की, राजकीय विरोध असू शकेल परंतू मी आज आपल्या सोबत एक भारतीय व्यक्ती म्हणून बोलत आहे. तेंव्हा राजकीय विरोध बाजूला राहिल आणि माझ्या देशाचा विषय बोलला जाईल. त्यांनी बहरीनला सांगितले की, आम्ही अनेक वर्षापासून पाकिस्तानकडून होणारा आतंकी हल्ला सोसत आहोत. आमचे अनेक बंधू यात मरण पावले आहेत. काही अंशी आम्ही त्यांना उत्तर दिले आहे. परंतू माझी विनंती आहे की, बहरीनकडून मिळणारी आर्थिक मदत ते आतंकवादी तयार करण्यासाठी वापरतात आणि त्यांचा वापर ते आमच्याविरुध्द करतात. म्हणून आपण त्यांना आर्थिक मदत देवू नये. सोबतच त्यांनी पाकिस्तानला सुध्दा इशारा दिला की, आता या पुढे जर आतंकवादी हल्ला झाला तर पाकिस्तानला भारत खुप मोठे उत्तर देईल, त्यांचे हे शब्द म्हणजे शब्दांनी केलेला सर्जिकल स्ट्राईक म्हणता येईल.

