नांदेड(प्रतिनिधी)-आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काही वेळातच नांदेडला पोहचणार आहेत. या पार्श्र्वभूमीवर रेल्वे पोलीसांनी रेल्वे स्थानक आणि रेल्वे रुळांवर मार्च करून काही घातपाताचा प्रकार आहे काय? याची बारकाईने तपासणी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आता काळी वेळातच नांदेडला येणार आहेत. या पार्श्र्वभूमीवर रेल्वे पोलीस, जीआरपी, आरपीएफ, एसआयपीएफ, नांदेड जिल्ह्याचे बॉम्ब शोधक व नाशक पथक यांनी सर्व रेल्वे फ्लाट तसेच रेल्वे रुळांवर रुटमार्च करून कोणती संशयीत वस्तू कोठे ठेवली आहे काय? याची तपासणी केली. सुरक्षेच्या दृष्टीकोणाने रेल्वे स्थानक परिसरात स्वतंत्र बंदोबस्त नेमण्यात आला होता. या रुटमार्चमध्ये चार अधिकारी आणि 35 कर्मचारी सहभागी झाले होते.

