नांदेड(प्रतिनिधी)- भारताचे गृहमंत्री अमित शाह हे नागपूर-नांदेड अशा तिन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून 26 मे रोजी दुपारी नवा मोंढा येथे त्यांची शंखनाद ही सभा होईल. सैन्याच्या शौर्यासाठी हा शंखनाद असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सुध्दा शंखनाद आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तिन दिवसाच्या नागपूर-नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यातील 26 मे रोजी नांदेडला कार्यक्रम घ्यावा अशी विनंती केली होती. म्हणून त्यांनी नांदेडला येणार आहेत असे अशोक चव्हाण म्हणाले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती राहील. 26 मे रोजी दुपारी 1 वाजता त्यांचे विमानतळावर आगाम होईल. विमानतळावरून थेट माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. हा कार्यक्रम महानगरपालिकेचा आहे. दुपारी भाग्यनगर रस्त्यावरील खा. अजित गोपछडे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजता नवा मोंढा मैदानावर शंखनाद सभा होईल. सैनिकांच्या शौर्यासाठी हा शंखनाद असल्याचे सांगितले. प्रथमत: नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या शपथविधीला 11 वर्ष पुर्ण झाली आहेत. राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती सुध्दा साजरी होणार आहे. अमित शाह विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल आभार व्यक्त करतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शंखनाद करतील. सायंकाळी 6 वाजता नाना-नानी परिसरातील भाजप महानगराध्य अमरनाथ राजूरकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होईल. पावसाचा अंदाज घेवून वॉटरप्रफु मंडप तयार करण्यात येईल. पंकजा मुंडे यांना सुध्दा निमंत्रीत करण्यात आले आहे. डी.पी.सावंत यांच्या सहमतीने त्यांचा भाजप प्रवेश होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी आहे. परंतू अद्याप निर्णयापर्यंत आलो नाहीत असे खा.चव्हाण म्हणाले. महसुल आयुक्त कार्यालयाची मंजुरी झाली आहे. लेंडी प्रकल्प पुर्ण व्हायला हवा. मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासाठी प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे असे खा.अशोक चव्हाण म्हणाले. शक्तीपिठ मार्गाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी भुमिका असेल तीच आमचीही भुमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी खा.अजित गोपछडे, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, संतुक हंबर्डे यांचीही उपस्थिती होती.
26 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शंखनाद सभा-खा.अशोक चव्हाण
