कपिल पोकर्णावर अखेर दरोड्याचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांनी मध्यस्थी सोडून अखेर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणात एकूण 1 कोटी 6 लाख 57 हजार 366 रुपयांचा ऐवज चाकूचा धाक दाखवून बळजबरीने चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
वास्तव न्युज लाईव्हने 22 मे रोजी वरिष्ठ कार्यालयातून दरोड्यात मध्यस्थी होणार असे वृत्त प्रश्नांर्थक चिन्हासह प्रसिध्द केले होते. त्याच प्रकरणात 23 मे रोजी आता दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
हरीओम सदाशिव डिगोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पाटील ट्रान्सपोर्ट महादेव पिंपळगाव येथून कपिल पोकर्णा व इतर सहा अनोळखी लोकांनी हरीओम डिगोळेला आणि त्याच्यासोबत शुभम केंद्रे याला धाक दाखवून ट्रकमध्ये भरलेला दगडी कोळसा, रोख रक्कम, काही आडत साहित्य जसे गहु, चनादाळ, हळद असा एकूण 1 कोटी 6 लाख 57 हजार 366 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती प्रसिध्द दिलेल्या पत्रकात लिहिली आहे. हा प्रकार 17 मे रोजीच्या दुपारी 11.30 वाजता घडला होता. दुकानाचे शटर तोडून त्यातील संगणक, सीसीटीव्ही, टेबल असे साहित्यपण दरोडेखोरांनी गायब केले आहेत. या प्रकरणी 22 मे रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल होण्याऐवजी त्यावर बऱ्याच चर्चा झाल्या, मध्यस्थी होणार होती या संदर्भाची बातमी वास्तव न्युज लाईव्हने प्रसिध्द केली होती. त्यानंतर आता 23 मे रोजी अर्धापूर पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 310(2), 303, 352, 351(2) आणि सोबत हत्यार कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 314/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम हे करणार आहेत.
परस्पर विरोधी गुन्हा दाखल
अर्धापूर गुन्ह्यात बळजबरीने दरोडा टाकून चोरून नेला ट्रक क्रमांक एम.एच.26 बी.ई.9297 हा सुमित राजेश चव्हाण रा.काब्दे हॉस्पीटल जवळ नांदेड यांचा असल्याची तक्रार सुध्दा 23 मे रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्या तक्रारीनुसार 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता सौभद्र ट्रेडर्स महाविरनगर नांदेड येथून एम.एच.26 बी.ई.9297 क्रमांकाचा ट्रक हरीष संभाजी राजेगोरे, ज्ञानेश्र्वर संभाजी राजेगोरे आणि गणेश गायकवाड यांनी संगणमत करून सौभद्र ट्रेडर्स महाविरनगर येथून 389.70 क्विंटल तांदुळ भरून साईबाबा राईस इंडस्ट्रीज सिडको गोंदिया येथे न पोहचविता लबाडी करून स्वत:च्या फायदासाठी फिर्यादीचा विश्र्वासघात करून परस्पर विक्री केला आहे. यामध्ये भरलेल्या तांदळाची किंमत प्रति क्विंटल 3025 रुपये आहे. तांदळाची एकूण किंमत 11 लाख 78 हजार 842 रुपये 50 पैसे होते. मग परस्पर विकलेल्या ट्रकची किंमत काय हा प्रश्न पोलीसांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट होत नाही. शिवाजीनगर पोलीसांनी या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 204/2025 फसवणूक या सदरात दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक आश्रुबा घाटे यांना देण्यात आला आहे.
संबंधीत बातमी…

वरिष्ठ पोलीस कार्यालयातून दरोड्यात मध्यस्थी होणार ?

 

2 thoughts on “कपिल पोकर्णावर अखेर दरोड्याचा गुन्हा दाखल

  1. वास्तव न्यूज नेहमी पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असते. आदरणीय खंडेलवाल साहेब कशाचीही पर्वा न करता सत्याची बाजू ठामपणे मांडतात

Leave a Reply to Avinash Chamkure Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!