नांदेड(प्रतिनिधी)-रात्रीचे जेवन करून गल्लीत पायी फिरणाऱ्या एका महिलेचे सोन्याचे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण किंमत 50 हजार रुपयांचे दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी तोडून पळ काढला आहे.
संजीवनी उमाकांत चोले या सन्मित्रनगर, गितानगर येथे राहणाऱ्या महिला 22 मे रोजी रात्री 10 वाजता रात्रीचे जेवन करून पायी फिरत असतांना समोरून दोन जण दुचाकीवर आले आणि मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण किंमत 50 हजार रुपयांचे हिसका मारुन बळजबरीने तोडून नेले आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 204/2025 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय वाणी हे करीत आहेत.
महिलेचे गंठण तोडले
