संवेदनशील व महत्वाच्या ठिकाणी ड्रोन उडविणे व चित्रिकरण करण्यास प्रतिबंध

 

नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील संवेदनशील व महत्वाच्या ठिकाणी ड्रोनव्दारे होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ड्रोन उडविणे व चित्रिकरण करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये 25 मे पासून ते 20 जुलै 2025 पर्यत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन आवश्यक असलेले जिल्ह्यातील मर्मस्थळे, शासकीय आस्थापना, मंदिरे व संवेदनशिल महत्वाचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहेत.* डॉ.शंकराराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प नांदेड अ वर्गवारी, दुरदर्शन केंद्र राजेंद्र नगर, किनवट अ वर्गवारी, आकाशवाणी केंद्र वरसणी नांदेड ब वर्गवारी, 220 के.व्ही.उपकेंद्र वाघाळा, नांदेड ब वर्गवारी, दुरदर्शन केंद्र वसरणी नांदेड क वर्गवारी यांचा समावेश आहे.

महत्वाच्या आस्थापना – श्री गुरू गोंविदसिंघजी विमानतळ नांदेड, डॉ.शंकराराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी, नांदेड, जिल्हा मध्यवर्ती कारागृह नांदेड, मध्यवर्ती बसस्थानक नांदेड, रेल्वे स्टेशन नांदेड, पी.व्ही.आर मॉल लातूर फाटा नांदेड, डी मार्ट कॅनाल रोड नांदेड.

महत्वाची धार्मिक स्थळे – सचखंड गुरूव्दारा नांदेड, रेणुकामाता मंदिर, संस्थान माहूर, ता.माहुर जि.नांदेड, दत्तशिखर मंदिर, संस्थान माहूर ता. माहूर जि. नांदेड, हेमाडपंथी महादेव मंदिर होटल ता.देगलूर जि. नांदेड या धार्मिक स्थळे यांची सुरक्षा लक्षात घेवून संभाव्य हल्ले रोखण्याच्या अनुषंगाने वरील ठिकाण प्रतिबंध क्षेत्र घोषित म्हणून ड्रोनद्वारे चित्रिकरणास मनाई करण्यात आली असून ड्रोण उडविणे यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अतंर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!