नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात रांची येथून दगडी कोळसा भरून आलेल्या दोन वाहनांना कपिल शेट पोकर्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बळजबरीने नेल्याचा प्रकार 17 मे रोजी घडला. या बाबतची तक्रार 21 मे रोजी पोलीस ठाणे अर्धापूर येथे देण्यात आली. त्यापुर्वी जिवे मारण्याच्या धमक्या संदर्भाची तक्रार 20 मे रोजी पोलीस अधिक्षक देण्यात आली. वरिष्ठ पोलीस स्तरावरून या प्रकरणी अगोदर नो इंटरेस्ट, नंतर चोरी आणि यापुढे दरोडा दाखल करण्याच्या चर्चा झाल्या. त्यानंतर दोन्ही पक्षांना वरिष्ठ कार्यालयात पाठवून देण्याचे आदेश झाले. याचा अर्थ मध्यस्थी पोलीस करणार असल्याचे दिसते. यालाच पोलीसींग म्हणतात काय असा प्रश्न या घटनेतून पुढे आला आहे.
दि.20 मे रोजी हरजी संभाजी राजेगोरे रा.पिंपळगाव ता.अर्धापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते मागील पाच वर्षापासून कपिल विजयकुमार पोकर्णा यांच्यासोबत आडतचा व्यापर करत होते. मागील एक वर्षापासून व्यापारात जमत नसल्याने त्यांच्यासोबत देवाण-घेवाण बंद झाली. तेंव्हा कपिल पोकर्णा, त्यांचे साथीदार सुखदेवसिंघ बुट्टर, मोहम्मद अकबर अब्दुल समद, सुमित चव्हाण यांनी वेळोवेळी माझ्या कामाच्या ठिकाणी आणि माझ्या घरी येवून वारंवार धमक्या देत आहेत. माझे घर आणि माझी संपत्ती ताब्यात घेवून तुला रस्त्यावर आणतो म्हणत आहेत. माझ्या मालमत्तेविरुध्द पेपरमध्ये जाहीर प्रगटन देवून मानसिक त्रास देत आहेत.
त्यानंतर 21 मे रोजी पुन्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात एक अर्ज आला आणि हा अर्ज हरीओम सदाशिव डिगोळे यांनी दिला आहे. या अर्जानुसार ते पाटील टान्सपोर्ट पिंपळगाव महादेव येथे कार्यरत आहेत. आमचे मालक हरजी संभाजी राजेगोरे यांचा ट्रक क्रमांक एम.एच.26 बी.ई.9297 हा भाडेभरून रांची येथे गेलो. त्यावेळी आमच्यासोबत दुसरा ट्रक क्रमांक एम.एच.26 सी.एच.9427 पण होता. तेथून दगडी कोळसा भरून तो दगडी कोळसा चंद्रपूरला रिकामा केला. तेथून 87 हजार 500 रुपये भाडे घेवून साधा कोळसा भरला आणि चंद्रपुर ते कुष्णूर हे भाडे घेवून आम्ही 16 मे रोजी परतीच्या प्रवासाला निघालो. 17 मे रोजी आम्ही नांदेडला आलो आणि आपल्या ट्रान्सपोर्ट समोर थांबलो तेंव्हा कपिल सेठ पोकर्णा व इतर सहा लोक दोन कार आणि एका दुचाकीवर आले. त्यांनी माझा ट्रक क्रमांक 9492 आणि दुसरा ट्रक 9497 हे दोन्ही ट्रक कोळसा भरला असतांना आणि आमच्याकडील भाड्याचे 1 लाख 62 हजार 500 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पुन्हा हेच लोक दुपारी 3 वाजता आले. त्यावेळी ते एका छोट्या हाती या गाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यालय फोडून दुकानातील संगणक, सीसीटीव्ही, दोन टेबल, खुर्च्या आणि एक कपाट तसेच महत्वाची कागदपत्रे भरून त्या गाडीत घेवून गेले. त्यावेळी तेथे रिकामा उभा असलेला ट्रक क्रमांक एम.एच.26 बी.7146 सुध्दा घेवून गेले.
सुरूवातीला या प्रकरणी वरिष्ठ पोलीस कार्यालयातून हे प्रकरण दिवाणी स्वरुपाचे आहे. त्यामुळे नो इंटरेस्ट दाखविण्यात आला. पण असाच इंटरेस्ट ठाणेदाराने दाखविला असता तर त्याच्यावर कसुरी अहवाल तयार झाला असता. पुढे या प्रकरणात अगोदर चोरी नंतर दरोडा आणि त्यानंतर दोन्ही पक्षांना वरिष्ठ कार्यालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले. याचा अर्थ आता मध्यस्थी होणार बरे झाले असा मध्यस्थी प ्रकार सर्वांसाठीच करावा. कारण घेवून गेलेले तिन ट्रक, रोख रक्कम, त्यात भरलेला कोळसा या सर्व साहित्याची किंमत लावली तर ती करोड रुपयांच्या वर होईल. मध्यस्थी करतांना त्या दोन पक्षांमध्ये खरे काय घडले होते. याचा शोध कोण घेईल. किंवा एकाच्या बाजूने एकावर अन्याय करायचा आहे म्हणून मध्यस्थी होत आहे काय असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत.
वरिष्ठ पोलीस कार्यालयातून दरोड्यात मध्यस्थी होणार ?
