भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याने आपल्याच आमदाराची फोटो एडिट करून खा. राहुल गांधींचे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न केला

भारताच्या संसदेतील विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांचे चारित्र्य हनन करण्यासाठी वाईट उद्देश ठेवून भारतीय जनता पार्टीचे अधिकारीक प्रवक्ते अजय आलोक राहुल गांधींचा एक फोटो डिलीट केला. त्या फोटोतील महिला ज्योती मलहोत्रा दिसत आहे. परंतु ती ज्योती मल्होत्रा नसून तो फोटो एडिटेड आहे. त्या फोटोतील महिला भारतीय जनता पार्टीच्या आज आमदार आहेत. अजय आलोक यांनी केलेला हा गंभीर प्रकारचा गुन्हाच आहे. अली खान विरुद्ध गुन्हा दाखल होतो तर अजय आलोक वर का होणार नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अजय आलोकला कळलेच नाही की, आपण किती गंभीर चूक केली आहे. दशद्रोहाच्या आरोपी सोबत फोटो कसा असा प्रश्न उपस्थित करून ट्वीट केलेला हा फोटो आता त्यावरच उलटला आहे आणि अजय आलोक वरच लोक हसत आहेत. अजय आलोकने ट्विट केलेला खरा फोटो आमदार अदिती सिंह यांच्या आहे.रायबरेली, अमेठी या उत्तर प्रदेश मधील मतदारसंघांमध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा राजकीय प्रभाव मजबूत आहे. 2002 पर्यंत आदिती सिंह काँग्रेसची जोडलेल्या होत्या. काही काळापूर्वीच त्या भाजपची जोडल्या गेल्या आणि आज आमदार झाल्या. कोणताही सर्वसाधारण माणूस या फोटोला पाहील तर हा फोटो एडिट केलेला आहे हे स्पष्टपणे जाणवते.आपल्याच पक्षाच्या आमदाराची आपण बदनामी करत आहोत याची कल्पना सुध्दा अजय आलोकला आली नाही. काँग्रेस नेत्या सुप्रिया सुनेत यांनी फोटो रिट्वीट करून परतीचा हल्ला केला आहे. कोणी व्हाट्सअप वर पार्टीचा प्रचार राबवणाऱ्या टीमने असे केले असते किंवा ट्रोलिंग करणाऱ्या टीमने केले असते तर चालले असते.परंतु अधिकारीक प्रवक्त्याने केलेले हे ट्विट अत्यंत घातक आहे.जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी,राजीव गांधी, प्रियंका गांधी, पती वाड्रा,राहूल गांधी,एवढेच नव्हे तर महात्मा गांधी यांचे सुद्धा चरित्र हनन करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी मागे राहिली नाही. अर्णब गोस्वामी या अँकर ने तुर्कस्तानात काँग्रेसचे कार्यालय आहे अशी खोटी बातमी दाखवली. ही एकच खोटी बातमी नव्हती तर काँग्रेस बद्दल मागील दहा वर्षापासून खोट्या बातम्या येतच आहेत. पण त्यांच्यावर कोणी काही कार्यवाही करत नाही.अजय आलोकच्या ट्विटवर करण्यात आलेले कॉमेंट्स काही अशा प्रकारचे आहेत. की अनेक खोट्या बातम्या आपण अनेक वर्षापासून देत आहात, लाज वाटू द्या, डोक्यात शेण भरले आहे काय, स्वतःच्या आमदाराला तरी वगळा, अशा त्या प्रतिक्रिया आहेत पत्रकार म्हणून आम्हाला कोणतीही बाब तपासूनच त्याची बातमी करायची आहे. कारण आम्ही चुकीचे दाखवून आमच्या दर्शकांसोबत आणि आमच्या वाचकांसोबत तो धोका करू इच्छित नाही. भारतीय जनता पार्टीने चारित्र्य हननाचे जेवढे प्रयत्न केले त्याचा कोणताही पुरावा आजपर्यंत कोणी आणला नाही. भारतीय जनता पार्टी नेहमीच कमरेखालच्या भाषेत आरोप करत असते. अजय आलोकने आपल्याच आमदाराचा अपमान केला की नाही, कार्यवाही व्हावी की नाही या संदर्भाची आपली प्रतिक्रिया वाचकांनी सांगावी अशी आमची विनंती आहे विनंती आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!