नांदेड(प्रतिनिधी)-माहूर पोलीसांनी प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर लॉंजी शिवारात बेकायदा चोरी वाळू भरलेला एक ट्रॅक्टर पकडला आहे. पोलीसांनी एकूण 4 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दत्तात्रय भगवान सोनटक्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.16 मे रोजीच्या रात्री 12 वाजण्याच्या अगोदर त्यांनी मौजे लॉंजी शिवारातून पैनगंगा नदीपात्रातून बेकायदा चोरटी वाळू भरून येणारा ट्रॅक्टर थांबवला. त्यात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर एम.एच.26 ए.डी.6895 असा क्रमांक आहे. या ट्रॅक्टरमध्ये दीड ब्रास वाळू भरलेली होती. पोलीसांना पाहताच त्या गाडीचा चालक पळून गेला. त्यानंतर पोलीसांनी गाडी मालक लखन जाधव रा.लॉंजी ता.माहूर आणि एक अनोळखी फरार झालेला चालक अशा दोघांंविरुध्द गुन्हा क्रमांक 63/2025 दाखल केला आहे.
ही कार्यवाही अपर पोलीस अधिक्षक खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रकाश मुळे, पोलीस उपनिरिक्षक संदीप आनेबोईनवाड, पोलीस अंमलदार दत्तात्रय सोनटक्के, ज्ञानोबा खंदाडे यांनी केली.
माहूर पोलीसांनी चोरीच्या वाळूचा ट्रॅक्टर पकडला
