शहरातील बसस्थानक उड्डानपुलाखाली देवाच्या मुर्तीसह ऐवज चोरला

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील बसस्थानकाच्या ब्रिजखाली असलेले एक घरफोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे, देवाची पितळी मुर्ती आणि पितळी भांडे असा 1 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
शिलाबाई अशोक गोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 मे रोजी रात्री 4 वाजेच्यासुमारास शिवाजीनगर भागात बस स्थानकाच्या पुलाखाली असलेले त्यांचे घर फोडून चोरट्यांनी त्यातून काही सोन्याचे दागिणे, देवाची पितळी मुर्ती आणि काही पितळेचे भांडे असा एकूण 1 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 193/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस अंमलदार अकोसकर हे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!