रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिन शेतकऱ्यांच्या मोटार चोरल्या; काही ठिकाणी पिक चोरले; ऍल्युमिनियम वायर चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरट्यांनी लांबवल्या आहेत. तसेच होटाळा ता.नायगाव येथे शेताच्या आ खाड्यातील सोयाबिन, हरभरा, ज्वारी, मुग असे पिक चोरट्यांनी चोरून नेले आहे. लोहा तालुक्यातील किरोडा भागातून विद्युत खांबांवरील 6 हजार मिटर ऍल्युमिनियम वायर चोरण्यात आली आहे.
रामेश्र्वर माधवराव शेटेकर रा.लोहा ता.बिलोली यांच्या शेताच्या विहिरीत लावलेली विद्युत मोटार 32 हजार 180 रुपये किंमतीचे आणि त्याला जोडलेले तांब्याचे वायर 9 हजार रुपये किंमतीचे असा एकूण 41 हजार 180 रुपयांचा ऐवज 14-15 मेच्या रात्री चोरीला गेला आहे. रामतिर्थ पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 141/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार सोनकांबळे अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत लोहगाव शेत शिवारातील विठ्ठल रामजी सुब्बनवार यांच्या शेताच्या विहिरत असलेेले मोटार सुध्दा 14-15 मेच्या रात्री चोरीला गेली आहे. या मोटारीची किंमत 27 हजार 500 रुपये आहे आणि त्याला जोडलेले तांब्याचे वायर 5 हजार 670 रुपयांचे आहे. एकूण चोरीला गेलेला ऐवज 33 हजार 170 रुपयांचा आहे. रामतिर्थ पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 140/2025 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस अंमलदार सोनकांबळे अधिक तपास करीत आहेत.
होटाळा ता.नायगाव येथील गजानन मोहनराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14-15 मे च्या रात्री त्यांच्या शेतशिवारातील कालव्यावर लावलेली 15 हजार रुपये किंमतीचे मोटार तसेच माधव दिगंबर पवार यांच्या शेताच्या आखाड्यावर पत्राच्या शेडमध्ये ठेवलेले सोयाबिन, हरभरा, ज्वारी आणि मुग हे पिक 38 हजार रुपये किंमतीचे असा 53 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. नायगाव पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 96/2025 प्रमाणे दाखल केली आहे. तपास पोलीस अंमलदार सांगवीकर हे करीत आहेत.
वीज वितरण कंपनीचे गुत्तेदार अशोक रामभाऊ मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14-15 मेच्या रात्री किरोडा शेतशिवारात किरोडा ते कंधार रस्त्यावरील धावरी तांडा जवळ खांबावर लावलेले 6 हजार मिटर ऍल्युमिनियम वायर चोरट्यांनी चोरून नेल ेआहे. या वायरची किंमत 85 हजार रुपये आहेत. लोहा पोलीसांनी ही घटना 136/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस अंमलदार घुगे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!