नांदेड(प्रतिनिधी)- भोकर शहरातील एक किराणा दुकान फोडून चोरट्यांनी त्यातून तांदळाचे कट्टे, सोयाबीन तेल आणि इतर साहित्य असा एकूण 34 हजार 914 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
महेश बालाजीराव लाभशेटवार यांचे भोकर शहरात आरव किराणा दुकान आणि जनरल स्टोअर्स आहे. दि.14 मेच्या मध्यरात्रीनंतर 3.21 वाजेच्यासुमारास कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शटरची तोडफोडून करून आत प्रवेश केला आणि आतील तांदळाचे कट्टे आणि सोयाबीन तेल आणि काही इतर सामान असा एकूण 34 हजार 914 रुपयां चा ऐवज चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 250/2025 नुसार दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार कंधारे अधिक तपास करीत आहेत.
भोकर शहरात किराणा दुकान फोडले
