नांदेड(प्रतिनिधी)-एका 62 वर्षीय व्यक्तीला एका अनोळखी माणसाने पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि सोन्याची अंगठी असा 95 हजारांचा ऐवज फसवणूक करून घेवून गेला आहे.
उदय व्यंकटराव नाव्हेकर रा.गोपाळनगर सांगवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 मे रोजी सकाळी 10 वाजेच्यासुमारास खाटू शाम मंदिराजवळच्या कमानीजवळ असतांना एक अनोळखी व्यक्ती आला आणि मी पोलीस आहे अशी बतावणी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व हातात असलेली सोन्याची अंगठी असा 95 हजार रुपयांचा ऐवज फसवणूक करून घेवून गेला आहे. विमानतळ पोलजीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 177/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
62 वर्षीय व्यक्तीला पोलीस असल्याचे सांगून फसवले
