नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी पाण्याच्या टाकीजवळ दोन जणांनी एका 19 वर्षीय युवकाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम असा 12 हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे. सागर संतोष नवघरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 मे रोजी पहाटे 3 वाजेच्यासुमारास माळटेकडी पाण्याच्या टाकीजवळ शेख नईम आणि सय्यद मोईन या दोघांनी त्याला पकडून डोक्यात, हातावर आणि पाठीवर मारून जखमी केले आणि सागर नवघरेचा 7 हजार रुपयांचा मोबईल आणि 5 हजार रुपये रोख रक्कम लुटून नेली आहे. विमानतळ पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 176/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक वाणी अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,241 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महाराष्ट्र प्रदेश खांडल विप्र संगठन के चुनाव बिना चुनाव निर्णय अधिकारियों के हस्ताक्षर के घोषित 62 वर्षीय व्यक्तीला पोलीस असल्याचे सांगून फसवले