धनगर समाजाचे नेते महादेव जानकर काँग्रेससोबत जमवणार

येत्या 31 मे रोजी राष्ट्रीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीच्या तालकटोरा स्टेडीयममध्ये होणार आहे. या अधिवेशनात प्रमुख पाहुणे या पदावर विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांना बोलावून महादेव जानकर यांनी एक नवीन राजकीय पर्वाची सुरूवात केली आहे.कॉंगे्रसमध्ये असणाऱ्या राज्यातील आणि दिल्लीतील नेत्यांवर महादेव जानकरांचा उपयोग कसा घ्यावा हे अवलंबून आहे. कारण खा.राहुल गांधींना त्यांची नेते मंडळी काय फिड करतील याचा काही नेम नाही.
महादेव जानकर हे उच्च शिक्षीत अभियंते आहेत. त्यांनी स्वत: लग्न केलेले नाही. एक इमानदार व्यक्ती असे त्यांचे व्यक्तीमत्व आहे. आपल्या समाजासाठी स्वत:ला त्यांनी वाहुन घेतलेले आहे. राजकारणाची सुरूवात केली तेंव्हा अगोदर शरद पवार यांच्या सोबत सुरूवात झाली. परंतू या जगात प्रत्येक जण आपल्याच उपयोग करायला जन्मला आहे यानुसार त्यांचाही झालाच. तुमचा उपयोग होत आहे ही बाब महादेव जानकरांना भारतीय जनता पार्टीचे कै.नेते गोपिनाथ मुंडे यांनी समजून सांगितली आणि तेंव्हापासून जानकर गोपिनाथ मुंडे यांच्या सोबत आले. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ते पंकजा मुंडे यांच्यासोबत राहिले. परंतू ध्यास एकच होता. की, माझ्या धनकर समाजाचे आरक्षण प्रश्न पुर्ण व्हावेत. त्याला काही तरी गती मिळाली. आरक्षण धनगर समाजाला मिळावे यासाठी ते सतत झटत राहिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यावर त्या काळाता त्यांना पशुसंवर्धन विभागाचे मंत्री करण्यात आले होते. पाच वर्ष मंत्रीपद सांभाळतांना त्यांनी अनेकदा आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गळ घातली परंतू काही उपयोग झाला नाही. आज उद्या करत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना झुलवतच ठेवले. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षातील धनगर समाजाचे नेते राम शिंदे आणि गोपीनाथ पडळकर यांना पुढे आणले. तेंव्हा महादेव जानकरांच्या लक्षात आले की, युज ऍन्ड थ्रो अशा पध्दतीने आपला वापर सुरू आहे. म्हणून 2024 च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसोबत राहयचे नाही असा निर्णय महादेव जानकरांनी घेतला. लोकसभा निवडणुकीत परभणी मतदार संघातून त्यांचा पराभव झाला.
त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडी सोबत जमविण्याचा प्रयत्न केला आणि कॉंगे्रसने ते नाना पटोले यांची भेट घेतली तेंव्हा नाना पटोले यांनी सांगितले की जानकर आमचे 250 उमेदवार निवडूण येणार आहेत. आमच्याकडे आता कोणतीच जागा शिल्लक नाही आणि आम्हालाही कोणाची गरज नाही. पण विधानसभेचा निकाल आला तेंव्हा महाविकास आघाडीच्या फक्त 45 जागा निवडूण आल्या. यावर महादेव जानकर यांनी स्वत:ला एक प्रश्न विचारत माझ्या ओबीसी समाजासाठी काही करायचे असेल तर राज्यस्तरावर लढ्यापेक्षा देशस्तरावर लढले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुध्दा अनेकदा महादेव जानकरांना धनगर समाजाच्या आरक्षणावर बोलण्याची संधी मिळालेली आहे. पण उपयोग काही झालेला नाही.
पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जन्मोत्सवानंतर 31 मे 2025 रोजी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये महादेव जानकरांनी आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून जानकरांनी कॉंगे्रस नेते खा.राहुल गांधी यांना निमंत्रीत केले आहे. म्हणजे एनडीएचा एक नेता कमी झाला असाच त्याचा अर्थ होतो. महाराष्ट्राच्या विधानसभा मतदार संघांमध्ये 6-7 मतदार संघ असे आहेत. ज्यात धनगर समाजाचे मत त्या मतदार संघाच्या निर्णयासाठी निर्णायक ठरतात. त्यामध्ये परभणी, सोलापूर, बारामती, सातारा या मतदार संघांचा समावेश आहे. याशिवाय इतर मतदार संघांमधील 30-35 मतदार संघ असे आहेत की, धनगर समाजाचे मतदान त्या मतदार संघामध्ये निर्णायक असते. महादेव जानकर इतर नेत्यांच्या तुलनेत त्यांच्यात काहीच वाईट गुण नाही असे म्हणण्यासारखे व्यक्तीमत्व आहे. ते कोणाला भित नाहीत, त्यांना वाईट सवई नाहीत, कुटूंब नाही म्हणजे ते आणि त्यांचा समाज हाच त्यांचा परिघ आहे. परंतू त्यांना चांगल्या पध्दतीचे राजकारण येत नाही. खा.राहुल गांधी यांच्या सोबत या राष्ट्रीय अधिवेशनानंतर महादेव जानकर नावाच्या चाबीचा उपयोग कॉंगे्रस कशा पध्दतीने करील हे पाहण्यासारखे असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!