नांदेड(प्रतिनिधी)-जागांचा साामाईक वाद हा लवकर श्रीमंत होण्यासाठीचा मार्ग असतो. असाच एक प्रकार शहरातील सोमेश कॉलनीमध्ये घडला. त्या संदर्भाने मॉन्टीसिंघ जहागिरदारसह 12 जणांविरुध्द वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिपीका दिपकराव पाठक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घरात व मालकीच्या जागेत तोडफोड करून सीसीटीव्ही फुटेज तोडू द्या असे म्हणत काही जणांनी त्यांना 6 मे 2025 रोजी जिवेमारण्याची धमकी दिली. या जागेचा वाद न्यायालयात सुरू असून दिपक पाठक आणि त्यांचे चुलत बंधू प्रभाकर पाठक यांनी न्यायालयात संयुक्त पुरसीस देवून जैसे थे परिस्थिती राहावी असे न्यायालयास सांगितले असतांना सुध्दा हा प्रकार घडला आहे. माझ्या घरात 6 मे रोजी मॉन्टीसिंघ जहागिरदार, प्रभाकर सखारामपंत पाठक व इतर अनोळखी 10 ते 15 जण माझ्या घरात तोडफोड करण्याचा प्रयत्न करत होते. मला व माझ्या परिवाराला संपविण्याची धमकी देत होते. माझी मुले कामानिमित्त बाहेरगावी राहतात. घरी मी व माझे पतीच असतो अशा आशयाची ही तक्रार आहे. या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 149(2), 190, 352, 351(2), 324(4) आणि 333 नुसार गुन्हा क्रमांक 196/2025 दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
जागेच्या वादातून मॉन्टीसिंघ जहागिरदार, प्रभाकर पाठक यांच्यासह 10 अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल
