नांदेड(प्रतिनिधीस)-धनमुद्रा चिटफंड या वित्तीय संस्थेच्या नावाखाली बिसी चालवणाऱ्याने 16 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गुरूकृपा मार्केट येथे घडला आहे.
अरुण ग्यानोबा वट्टमवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2017 ते 2021 दरम्यान त्यांनी आणि त्यांच्या नातलगांनी गुरूकृपा मार्केटमधील धनमुद्रा चिटफंड कार्यालयात बीसी सुरू केली. खरे तर वित्तीय संस्था असतांना त्यात बीसी हा प्रकार चालविणे बेकायदेशीर आहे. फिर्यादी आणि इतरांकडून महिनेवारी रक्कम स्विकारून त्याचा उपयोग स्वत:च्या फायद्यासाठी करून धनमुद्रा चिटफंडच्या पावत्या दिल्या. यामुळे त्यांची आणि इतर साक्षीदारांची एकूण 16 लाख 30 हजारांची फसवणूक केली आहे. वजिराबाद पोलीसांनी या फिर्यादीवरुन गुन्हा क्रमांक 195/2025 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत लोंढे यांच्याकडे देण्यात आला आहे.
बीसीच्या नावावर 16 लाख 30 हजारांची फसवणुक
