
नांदेड(प्रतिनिधी)-आज देशभर युध्दाच्या पार्श्र्वभूमीवर रंगीत तालीम होणार होती. याच अनुशंगाने आज रेल्वे स्थानक नांदेड येथे महिला विश्रामगृहात घुसलेल्या दोन अतिरेक्यांना नंादेड जिल्हा पोलीस दलातील जलद प्रतिसाद पथकाने पकडून दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात दिले आहे.

लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधिक्षक स्वाती भोर, नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार आणि लोहमार्गचे पोलीस उपअधिक्षक संजय लोकरे यांच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकावरील रंगीत तालीम घेण्यात आली. त्यात आज सकाळी 11.15 वाजता रेल्वे स्थानक नांदेड येथील फलाट क्रमांक 1 वर असलेल्या महिला विश्रामगृहामध्ये दोन अतिरेकी घुसल्याची माहिती लोहमार्ग येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक हनमंत पांचाळ यांना प्राप्त झाली. त्यांनी लगेच नांदेड जिल्हा पोलीस दलाला याबद्दलची माहिती दिली. तेंव्हा क्युआरटी पथकाचे अधिकारी बोधगिरे, तसेच 33 पोलीस अंमलदार, पोलीस निरिक्षक सौ.तोटवाड, डाकेवाड, चार पोलीस अंमलदार, सीबा श्वान, पोलीस निरिक्षक दत्ता केंद्रे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अनित चव्हाण, पोलीस अंमलदार अकबर पठाण, जितेंद्रसिंह जालनावाले, गायकवाड, खय्युम, प्रल्हाद मिना, माधवराव, नांदेड रेल्वे डिव्हिजनचे अधिकारी व अंमलदार, अग्नीशमन दलाचे प्रमुख निलेश कांबळे, त्यांचे अधिकारी व चार कर्मचारी, सोबत वैद्यकीय अधिकारी मयुर तिवारी यांच्यासह एक रुग्णवाहिका, गंगा काबु पथक रेल्वे स्थानकावर क्षणाधार्थ पोहचले.

अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने नांदेडच्या जलद प्रतिसाद पथकाने आपल्या एके 47 रायफलीच्या मदतीने केलेल्या प्लॅनिंग प्रमाणे त्यांनी महिला विश्रामकक्षात दबाधरुन बसलेल्या दोन्ही अतिरेक्यांना जेरबंद करून दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात दिले. रेल्वे स्थानकावर या कार्यवाहीचा गोंधळ होवू नये म्हणून मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये ध्वनीक्षेपकावरुन सुचना दिल्या जात होत्या. तरी पण काही जणांच्या काळजात धडकी नक्कीच भरली असेल. पण पोलीसंानी वेगवेगळ्या पध्दतीने जनतेला याबद्दल आश्वस्त करून त्यांना देण्यात आलेले काम पुर्ण केले. या कार्यवाहीत एकूण 12 अधिकारी आणि 52 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला होता.
