नांदेड(प्रतिनिधी)-तामसा येथे अनेक दुकाने फोडून चोरट्यांनी 3 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.
पवन शाम कोटगिरवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 मे च्या रात्री 10 ते 5 मेच्या पहाटे 6 वाजेदरम्यान त्यांचे आणि काही इतर दुकाने अशी दुकाने फोडून चोरट्यांनी त्या सर्व दुकानांच्या गल्यामध्ये असलेली एकूण 3 लाख 47 हजार रुपयांचा रोख रक्कम चोरून नेली आहे. तामसा पोलीसांनी या अनेक घटनांचा एक गुन्हा क्रमांक 84/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक खेडकर अधिक तपास करीत आहेत.
तामसा येथे काही दुकाने फोडून चोरट्यांनी 3 लाख 50 हजार रुपये रोख चोरले
