एक हे तो सेफ है असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी जातीय जनगणणा जाहीर करून नवीन शत्रुत्व तयार करण्याचा विडा उचलला

जातीय जनगणणा जाहीर करून केंद्र सरकारने काही तरी डाव आखला त्यात सर्वात मोठा डाव असाही आहे की, धर्माच्या नावावर एकत्रीत दिसणाऱ्या मुस्लीम समाजाला जातीच्या नावावर वेगळे पाडण्याचा प्रयत्न होणार आहे. पाकिस्तानविरुध्द तयार केलेले नॅरेटिव्ह बदलण्यासाठी जातीय जनगणणेचा डाव केंद्र सरकारने खेळला आहे. हे सर्व होत असतांना लेफ्टनंट विनय नरवालच्या पत्नी ज्यांना दुर्देवाने चौथ्याच दिवशी विधवा पद मिळाले त्या हिमांशी नरवाल मात्र देशात सुरू असलेल्या शत्रुत्वाच्या भावनेचा विरोध करातात आणि आपल्या नवऱ्याला जय हिंद विनय असे म्हणून शेवटचा निरोप देतात. काय घ्यायला पाहिजे यातून हे वाचकांनी ठरवायचे आहे.


पहलगाम हल्ला झाल्यानंतर विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नी हिमांशी यांच्या फोटोला कार्टूनमध्ये बदलून धर्म विचारून मारले असे नॅरेटिव्ह तयार करून देशात हिंदु-मुस्लिम भांडण व्हावे हा पाकिस्तान एजंटांचा अजेंडा भारतीयांनी सुध्दा चालविला. पण तसे काही घडले नाही. काही ठिकाणी मात्र कश्मिरी विद्यार्थ्यांना वस्तीगृहात मारहाण झाली. त्या कश्मिरी विद्यार्थ्यांचे नातलग होते काय आतंकवादी.जम्मू काश्मिर पोलीसांचा कर्मचारी बिनधास्त भाई शेख मुद्दसिर अहेमद यांना मृत्यूनंतर शौर्य चक्र प्रदान करणाऱ्या भारतीय सरकारने त्यांच्या आई शमीम अख्तर यांना पाकिस्तानी म्हणून परत पाठविण्याचा निर्णय घेतला. ज्या आईसमोर शासनाने हात जोडले, तिचे धन्यवाद व्यक्त केले. त्याच आईला परत पाठविण्याचा निर्णय किती मुर्खपणाचा आहे.


लोकसभा निवडणुकीच्या भाषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत होते की, कॉंगे्रसच्या खतरनाक कटापासून तुम्ही सावध राहा. आम्ही जर एक राहिलो नाही तर सुरक्षीत राहणार नाहीत. असे शब्द प्रसारीत केले. त्याचा परिणामही झाला. परंतू जनतेने 240 किंवा विश्लेषकांच्या मते ईव्हीएम नसते तर 180 या संख्येवर भारतीय जनता पार्टीला त्यांची दाखवली. तरी पण कुबड्यांच्या आधारे त्यांनी सरकार बनवलेच .कारण खोटे नॅरेटीव्ह तयार करणे, त्या नॅरेटीव्हला बदलून नवीन नॅरेटीव्ह आणणे, दोन समाजामध्ये भांडण लावणे आणि आपली राजकीय पोळी भाजून घेणे यामध्ये भाजप मास्टर आहे. अशाच पध्दतीचे नॅरेटीव्ह विनय नरवाल आणि हिमांशी नरवाल यांच्या फोटोचे कार्टूून तयार करून पसरविलेल्या नॅरेटीव्हला पाहिजे तसा प्रतिसाद आला नाही. दुसरीकडे युध्द करता येत नाही अशी परिस्थिती आहे. कारण रशियाकडून चिनने आताच नवीन हत्यारे घेतली आहेत. आपली वायुसेना पाकिस्तानने सिमेजवळ उभी केली आहे. पाणी बंद करण्याची घोषणा केली पण ते करता येत नाही आणि केलेली नाही. मग सगळ्या बाबी आपल्या विरोधात जात असतांना काही तासांपुर्वी आरएसएस प्रमुख मोहनजी भागवत यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावले होते आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली. मोहनजी भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली याचा डाटा आमच्याकडे नसला तरी जातीय जनगणनेच्या विषयावरच चर्चा झाली असणार असे आमचे मत आहे.


अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतांना सांगितलेले पहिले वाक्य खुप महत्वाचे आहे. यापुढे ज्या वेळेस जनगणणा होईल. त्यावेळेस त्यामध्ये जातीचा विषय घेतला जाईल. यापुर्वी जनगणणा झाल्या. त्यात सर्वात शेवटीची 2011 मध्ये झाली. त्या सर्व्हेक्षणात 30 कॉलम होते. ज्यामध्ये फक्त अनुसूचित जाती आणि अनुसुचित जमाती यांच्यासाठीच जातीचा कॉलम होता. यासर्व प्रकरणाला तयार करतांना हाही विचार केला गेला की भारताची लोकसंख्या वाढली गेली आहे. त्यामुळे लोकसभेच्या खासदार पदांचे परिसिमन व्हायचे आहे आणि हे परिसिमन करतांना त्यासही बऱ्याच जागी विरोध आहे. विपक्षांचा मुद्दा त्यांनी घेतला काय? किंवा स्वत:चा तयार केला काय? या बाबींपेक्षा हा विषय आजच का घेतला हा महत्वपुर्ण प्रश्न आहे. भारताच्या सैन्याला खुली मुभा दिली असे सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. जेंव्हा सैन्य काम करते तेंव्हा ते राजकीय लोकांना विचारत नसते. परंतू राजकीय इच्छा शक्ती सैन्याच्या कामांच्या सुरूवातीसाठी खुप महत्वाची आहे. आम्ही खुप खुलीसुट दिली असे सांगून राजकीय लोकांनी चांगले झाले तर आम्ही केले आणि नाही झाले तर सैन्याला अधिकार दिला होता असे म्हणण्याचा बोटाला थुक्का लावण्याचा प्रकार सरकारने आपल्या जवळ ठेवला आहे. म्हणूनच जातीय जनगणणा करणार ही घोषणा करून युध्दाच्या नॅरेटीव्ह पासून जनतेला लक्ष विकेंद्रीकरण करण्याचा हा प्रकार आहे. फक्त एवढेच नव्हे तर बरेच मुद्दे मागच्या काही महिन्यापासून जे फक्त चर्र्चेत होते ते आता मागे पडणार आहेत.


आता मुस्लिम समाजाच्या जाती सुध्दा मोजल्या जाणार आहेत. मुस्लिम समाज धर्माच्या नावावर नेहमीच एकत्रित असतो. पण काही जाणकार, अभ्यासक लोक सांगतात की, धर्माचा विषय वेगळा पण जातीच्या विषयावर मुस्मिल समाजामध्ये सुध्दा द्वेष आहेच आणि हा द्वेष जातीय जनगणणे उघड होईल. त्याचाच फायदा घेण्यासाठी हा प्रकार घडविला काय? मागील 30 वर्षापासून जात आणि धर्म या विषयावर भारतीय राजकारण चालविले जात आहे आणि पुढे 30 वर्ष असेच चालणार आहे. संविधानाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांना हा फाटा आहे. पण आज काय करता येईल हा विषय खुप महत्वाचा आहे आणि हीच चर्चा घडविण्यासाठी जातीय जनगणणा होईल पण ती कधी आणि केंव्हा याचे काही निश्चित स्वरुप आज उपलब्ध नाही. सन 2023 मध्ये बिहारमध्ये जातीय जनगणणा झाली. ज्यात 17.7 टक्के मुस्लिम समाज आहे. आरएसएसच्या विचारप्रणालीप्रमाणे हिंदुस्थानमध्ये राहणारा प्र्रत्येक व्यक्ती हा हिंदुच आहे. आजचे कश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुला कधी काळी म्हणाले होते की, आम्ही सुध्दा परावृत्तीत मुस्लिम आहोत. परंतू आज आमच्यावर आरोप करता येणार नाही कारण आमच्या परिवर्तनाला जवळपास 700 वर्ष झाली आहेत. बिहारच्या मुस्लिम जातीच्या गणणेत 4.8 टक्के मुस्लिम सुधारीत आहेत, 2.3 टक्के मागासलेले आहेत आणि 10.5 टक्के अतिमागसलेले आहेत. ज्यांचा उल्लेख भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पसमांदा मुस्लिम असे करतात. त्यांना तर वफ्फ कायद्याने सुध्दा फायदा होणार आहे असे ते म्हणाले पण हे सुध्दा खोटे नॅरेटीव्ह आहे. मुस्लिम समाजातील 3.5 टक्के मोमीन, जुलाह आणि अन्सारी या जाती आहेत. त्यात पुढारलेल्या जातींमध्ये सय्यद, शेख आणि पठाण यांचा क्रमांक आहे.या 3 टक्के लोकांकडेच शिक्षण, व्यवसाय, संपत्ती असल्याचा एकंदरीत आलेख आहे. म्हणजे जातीय जनगणणा करून मुस्लिम समाजाच्या जातींमध्ये सुध्दा दगड टाकण्याचा हा प्रकार आहे.


इकडे हे सर्व होत असतांना काल 1 मे रोजी बैसारन घाटीमध्ये भेळ खात असतांना नौसेनेतील लेफ्टनंट विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नी हिमांशी यांना अतिरेक्यांनी विचारले तुम्ही मुस्लिम आहात काय ? सैन्यात अधिकारी असलेले विनय यांनी अत्यंत जोरदारपणे मी हिंदु असल्याचे सांगितले. अतिरेक्यांनी पहिली गोळी त्यांच्या डोक्यात मारली, दुसरी मानेत मारली आणि तिसरी पोटात मारली. आपला चार दिवसांपुर्वी झालेला नवरा मरण पावताच हिमांशी त्यांच्या पार्थिवाजवळ बसल्या. विनयचे आजोबा सांगत होते (ते सुध्दा पोलीस उपनिरिक्षक होते) अतिरेक्यांकडे बंदुक नसती तर आमच्या नातवाने पाच पैकी तीन अतिरेक्यांना नक्कीच यमसदनी पाठविले असते. असा हा भारताचा वाघ मरण पावल्यानंतर त्याच्या फोटोचे कार्टून तयार करून भारतीय जनता पार्टीने त्याचा वापर केला. 1 मे रोजी हिमांशी सार्वजनिकरित्या म्हणाल्या माझा नवरा मरण पावला आहे. पण त्यात कोणताही हिंदु–मुस्लिम विषय बोलण्याची गरज नाही. 18 एप्रिल रोजी विनय आणि हिमांशी यांचे लग्न झाले आणि 22 एप्रिल रोजी त्या विधवा झाल्या. तरी पण त्या आपल्या व्यक्तीगत दु:खापेक्षा समाजात आणि देशात पसरविल्या जाणाऱ्या द्वेष भावनेचे दु:ख वाटत आहे. सलाम अशा विरपत्नी हिमांशी यांना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!