नांदेड-मुलांमधील पाण्याची भीती जाऊन साहसी वृत्ती निर्माण व्हावी. सुट्टीच्या वेळेचा सदुपयोग जलतरणाची सर्वोत्तम आरोग्यदायी जीवनदायी कला आत्मसात व्हावी, म्हणून गोदावरी ऍक्वेटिक असोसिएशनने सात वर्षांवरील मुलामुलींसाठी दिनांक २० एप्रिल ते ११ जून २०२५ असा ४५ दिवसांचा तंत्रशुद्ध जलतरण प्रशिक्षण वर्ग कै. शांतारामजी सगणे जलतरणीका गोकुळ नगर येथे सकाळी दहा ते अकरा व सायंकाळी सात ते आठ या वेळेत योजला आहे. अनुभवी प्रशिक्षक, ४५ दिवसात जलतरण कला अवगत होण्याची हमी. नंतर प्रशिक्षणार्थ्यांच्या जलतरण स्पर्धा. दृकश्राव्य माध्यमातून अचूक व सर्वांगीण मार्गदर्शन ही वर्गाची खास वैशिष्ट्ये आहेत वर्गाचे ४५ दिवसांचे शुल्क रुपये २५०० आहे. पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील आढाव व सचिव प्राध्यापक ओम प्रकाश गुंजकर यांनी केले आहे. इच्छुक पालकांनी जलतरणीकेवर प्रशिक्षक राजेश सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधावा. प्रवेश मर्यादित आहेत याची नोंद घ्यावी.
More Related Articles
सकाळच्या ट्रॅक्टर अपघातात सात महिला कामगारांचा मृत्यू
नांदेड(प्रतिनिधी)-आलेगाव उत्तर शिवारात भुईमुग निंदण्याच्या कामासाठी गुंज ता.वसमत येथून आणलेल्या मजुरांपैकी 7 महिलांचा मृत्यू ट्रॅक्टर…
7 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
नांदेड :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही…
विमानतळ पोलीस ठाण्यात रात्री 10 नंतर होते हजेरी
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्यात रात्री 10 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत हजेरी घेण्याचा प्रकार सुरू…
