कंधार(प्रतिनिधी)-सन 2019 मध्ये एका बस चालकाला मारहाण करणाऱ्या तीन जणांना कंधार येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी तीन महिने कैद आणि प्रत्येकास 4 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार अहमदपुर एस.टी.आगारातील चालक माधव अंबादासराव वाघमारे हे 27 जुलै 2019 रोजी अहमदपुर येथून नांदेडकडे येणारी बस घेवून निघाले असतांना ही बस पार्डी फाट्याजवळ आली. तेथे दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी चुकीच्या दिशेने प्रवास करून बस गाडी थांबवली आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी जागा का देत नाही म्हणून चालक माधव वाघमारे यांना मारहाण केली. ज्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम झाली. माधव वाघमारे यांच्या तक्रारीवरुन लोहा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 102/2019 दाखल केला होता. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची 353, 332 आणि 34 जोडण्यात आली होती. या घटनेचा तपास करून लोहा पोलीसांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न् न्यायाधी कंधार यांच्याकडे आरोप पत्र दाखल केले. या खटल्यात एकूण तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या जबानी आणि सहाय्यक सरकारी वकील ऍड. महेश कागणे यांनी केलेला युक्तीवाद लक्षात घेवून कंधार न्यायालयाने बस चालकास मारहाणार करणारे आरोपी एकनाथ बाबुराव वाळके, गोविंद अशोकराव हाते आणि सचिन वाळके या तिघांना भारतीय दंड संहितेच्या कलम 353 तिन महिने कैद व दोन हजार रुपये दंड तसेच कलम 332 प्रमाणे तीन महिने कैद व 2 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या खटल्या लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मठपती यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका बजावली.
एस.टी. चालकास मारहाण करणाऱ्या तिन जणांना शिक्षा
