नांदेड – 7 एप्रिल ” जागतिक आरोग्य दिन ” निमित्त सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्य मध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना दरवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मा. विधान सभा सभापती मा. प्रा. राम शिंदे, आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर साहेब यांच्या हस्ते नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक मा.डॉ.निळकंठ भोसीकर साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ संगीता देशमुख मॅडम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा. सं.) डॉ राजाभाऊ बुट्टे, धर्माबादचे वैद्यकीय अधिक्षक डॉ वेणूगोपाल पंडित, उपजिल्हा रुग्णालय देगलूर डॉ. नरेश देवणीकर, माहूर ग्रामीण रुग्णालय चे डॉ. किरणकुमार वाघमारे, किनवट तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. सन 2024- 25 या वर्षात झालेल्या कामगिरीचे मूल्यमापन राज्याच्या आरोग्य विभागाने पूर्ण केल्यानंतर पुरस्कार जाहीर केले आहे .यामध्ये नांदेड जिल्ह्याला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व माता बाल संगोपन कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केले . तसेच राज्यात प्रथम कुटुंब कल्याण कार्यक्रम, उपजिल्हा रुग्णालय स्तर राज्यात प्रथम उपजिल्हा रुग्णालय देगलूर मोठ्या शस्त्रक्रिया करिता, ग्रामीण रुग्णालय 30 खाटा राज्यात प्रथम ग्रामीण रुग्णालय माहूर जि. नांदेड मोठ्या शस्त्रक्रिया या आरोग्य विभागातील महाराष्ट्र शासनाने राज्यपुरस्कार जाहीर केला होते .कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट 16 हजार 750 त्यापैकी साध्य 13,760 पूर्ण करून 83% काम पूर्ण करून राज्यात प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
किनवट आणि माहूर येथील मोबाईल मेडिकल युनिट कार्यक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणारा जिल्हा नांदेड यांना द्वितीय पुरस्कार पुरस्कार असे दोन पुरस्कार आज जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने 7 एप्रिल 2025 रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये आयोजित कार्यक्रमात पुरस्कार देताना प्रा.राम शिंदे, सभापती विधानपरिषद मुंबई,सार्वजनिक आरोग्य मंत्री, महाराष्ट्र शासन मा. प्रकाश आबिटकर साहेब,आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक, आमदार मनिषा कायदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख, किनवट तालुका आरोग्य अधिकारी डॉ के पी गायकवाड, सचिन कोताकोंडावार यांना सार्वजनिक आरोग आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणारे जिल्ह्यातील आरोग्य विभागातील विविध संवर्गातील अधिकारी यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे
नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे हे चार पुरस्कार मिळाल्याचे फलित आहे असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांनी व्यक्त केले. नांदेड जिल्ह्याला राज्यस्तरावरील चार पुरस्कार आरोग्य विभागाला मिळाल्यामुळे जिल्ह्याची मान उंचावली आहे..