पिंपराळा शिवारातून दोन गायी गेल्या चोरीला

नांदेड (प्रतिनिधी)- पिंपराळा शिवारातील एका घरासमोर बांधलेला दोन गायी अशा 60हजार रूपयांचे पशुधन 5 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर चोरीला गेले आहे.

राघोजी विठ्ठलराव कल्याणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पिंपराळा शिवारातील, लोहा फाट्यावर ता. हदगाव येथे त्यांच्या घरासमोर अंगणात दोन गायी बांधलेल्या होत्या. त्या गायी 5 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत. तामसा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र. 66/2025 दाखल केला असून पोलीस अंमलदार पवार अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!