नांदेड(प्रतिनिधी)-काकांडी येथील एका व्यक्तीला 1 जानेवारी रोजी वसंतराव चौकातील पुतळ्यासमोरच्या रस्त्यावर मारहाण करून 20 हजार रुपये लुटल्याचा प्रकार घडला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी 4 एप्रिल रोजी या संदर्भाने गुन्हा दाखल केला आहे.
कांंकाडी येथील हनमंत सदाशिव भवर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजता ते वसंतराव नाईक चौकातील पुतळ्यासमोरील रस्त्यावर उभे असतांना एक अनोळखी सुरक्षा रक्षक आणि इतर आरोपींनी मिळून तु इथे का थांबलास असे म्हणून शिवीगाळ केली आणि लोखंडी रॉडने पायावर मारुन फॅक्चर केले आणि त्यांच्या खिशातील 20 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकावून नेली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा तक्रार आल्यानंतर 4 एप्रिल रोजी क्रमांक 139/2025 नुसार दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक किशोर गावंडे अधिक तपास करीत आहेत.
मारहाण करून 20 हजार रुपये लुटले
