नांदेड :- सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्य मध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना दरवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन 2024 – 25 या वर्षात झालेल्या कामगिरीचे मूल्यमापन राज्याच्या आरोग्य विभागाने पूर्ण केल्यानंतर पुरस्कार जाहीर केले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्याला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व माता बल संगोपन कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने पुरस्कार जाहीर केला आहे .कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट 16 हजार 750 त्यापैकी साध्य 13,760 पूर्ण करून 83% काम पूर्ण करून राज्यात प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
दुसरा पुरस्कार मोबाईल मेडिकल युनिट कार्यक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणारा जिल्हा नांदेड यांना दुसरा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये जिल्ह्यामधील अतिदुर्गम किनवट, माहूर या भागात उपलब्ध व्यवस्थेचा परिणामकारक वापर करून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी वेळोवेळी घेतलेल्या बैठक माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत त्यांनी अतिशय दुर्गम भागात लाभार्थी पर्यंत जाऊन साधलेला संवाद व कारखाना वीट भट्टी काम करणारे कामगार यांच्या झोपडीवर व पालावर स्वतः जाऊन गरोदर माता, गरोदर माता लाभार्थी बालके यांना सेवा कशी ग्रामीण भागात उपलब्ध होतील यासाठी त्यांनी आकस्मिक दौरे व भेटी देऊन अतिदुर्गम भागात नियोजन करून लाभार्थ्या पर्यंत आरोग्य यंत्रणे मार्फत सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे मोबाईल मेडिकल युनिट द्वारे युनिट कार्यक्रमांतर्गत उत्तम कामगिरी केल्यामुळे राज्याचा दुसरा पुरस्कार नांदेड जिल्ह्याला मिळालेला आहे. हा पुरस्कार जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने 7 एप्रिल 2025 रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृह येथे राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आणि त्या ठिकाणी या कार्यक्रमात त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणारे जिल्ह्यातील आरोग्य विभागातील विविध संवर्गातील जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, ए एन एम चार कर्मचारी आशा यांना सन्मानित करण्यात येणार आहे .
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख जुलै 2024 रोजी रुजू झाल्या त्यांनी कमी कालावधी मध्ये आरोग्य सेवा ग्रामीण भागातील लाभार्थी ना कशा उपलब्ध होतील यासाठी सतत जिल्ह्यामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या बैठका घेणे व नियोजन करून सतत जिल्ह्यात दौरे केले त्यामुळे जिल्ह्याला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत प्रथम पुरस्कार मिळालेला आहे यासाठी मोबाईल युनिट मोबाईल मेडिकल युनिट कार्यक्रमांतर्गत जो पुरस्कार मिळालेला आहे किनवट व माहूर अतिदुर्गम भागामध्ये असलेल्या गाव, वाडी, ताडे व वस्ती या ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध करुन सेवा दिल्यामुळे राज्य राज्याचा दुसरा पुरस्कार मिळाला आहे. यासाठी एकात्मिक आदिवासी प्रकल्प किनवट येथील तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी घेतलेल्या बैठका व मार्गदर्शन व जिल्हा स्तरावर तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करण मॅडम यांचे मार्गदर्शन यामुळे व जिल्ह्यातील आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे हे दोन पुरस्कार मिळाल्याचे फलित आहे असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी व्यक्त केले नांदेड जिल्ह्याला राज्यस्तरावरील दोन पुरस्कार आरोग्य विभागाला मिळाल्यामुळे जिल्ह्याची मान उंचावली आहे.