नांदेड(प्रतिनिधी)-दुचाकीवर जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण दोन अनोळखी चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार मनगपुरा भागात घडला आहे. सुप्रिया सुरेश सुरोशे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास त्या आपल्या दुचाकीवर जात असतांना मगनपुरा भागातील भाटीया कॉम्प्लेक्सजवळ दोन अनोळखी लोकांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण 1 लाख रुपये किंमतीचे बळजबरीने तोडून नेले आहे. शिवाजीनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 87/2025 प्रमाणे दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक कदम हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 909 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हिमायतनगर पोलीसांनी चोर पकडला पोलीस विभागाची निर्भाया रॅली लक्षवेधक